ChatGPT Privacy Risk: AI सोबत बोलणं थांबवा! तुमचे चॅट कोर्टात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात; वकिलांचा मोठा इशारा

Chatgpt Privacy Legal Risk: अमेरिकेतील न्यायालयाच्या निर्णयानुसार ChatGPT आणि Claudeवरील संभाषण कोर्टात पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते.
Chatgpt Privacy Legal Risk
Chatgpt Privacy Legal RiskPudhari
Published on
Updated on

Chatgpt Privacy Legal Risk: आजच्या डिजिटल युगात अनेक लोक वैयक्तिक किंवा कायदेशीर सल्ल्यासाठी AI चॅटबॉट्सचा वापर करत आहेत. पण आता अमेरिकेत वकिलांनी आपल्या क्लायंट्सना स्पष्ट इशारा दिला आहे की, ChatGPT किंवा Claude सारख्या AI टूल्सवर संवेदनशील माहिती शेअर करताना सावध राहा.

नेमकं प्रकरण काय?

न्यूयॉर्कमधील फेडरल न्यायाधीश जेड राकॉफ यांनी दिलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर ही चर्चा सुरु झाली आहे. या निर्णयानुसार, AI चॅटबॉट्ससोबत झालेल्या संभाषणांना कोर्टात पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं.

Chatgpt Privacy Legal Risk
India Oil Import Ban: भारताला मोठा झटका! रशिया-इराणकडून तेल खरेदीवर अमेरिकेचा ब्रेक; पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार?

AI चॅट्स सुरक्षित नाहीत

कायदेशीर क्षेत्रात “Attorney-Client Privilege” म्हणजे वकील आणि क्लायंटमध्ये गोपनीय संवाद होतो. पण कोर्टाने स्पष्ट केलं की AI प्लॅटफॉर्म आणि युजर्समध्ये असा कोणताही कायदेशीर गोपनीय संबंध नसतो. म्हणजेच, ChatGPT किंवा Claude वर तुम्ही जे काही लिहिता, ते पूर्णपणे गोपनीय असेलच असं नाही.

कोणत्या प्रकरणामुळे चिंता वाढली?

GWG होल्डिंग्स कंपनीचे माजी अधिकारी ब्रॅडली हेप्नर यांनी त्यांच्या बचावासाठी Claude AI वापरला होता. पण कोर्टाने त्या AI मधून तयार केलेले दस्तऐवज सादर करण्याचे आदेश दिले. यामुळे स्पष्ट झालं की AI वर केलेले संवाद कोर्टात उघड होऊ शकतात.

वकिलांनी काय इशारा दिला?

अनेक कायदे तज्ज्ञांनी सांगितलं की:

  • AI ला “विश्वासू सल्लागार” समजू नका

  • कायदेशीर प्रकरणांबाबत माहिती शेअर करू नका

  • संवेदनशील डेटा देण्यापूर्वी विचार करा

Chatgpt Privacy Legal Risk
MGNREGA No Wage Hike: मनरेगाच्या कामगारांना मोठा झटका; यावर्षी वेतनवाढ होणार नाही, काय आहे कारण?

सर्व कोर्टांचा एकच निर्णय नाही

महत्त्वाचं म्हणजे, सर्व न्यायालयांचा दृष्टिकोन सारखा नाही. काही प्रकरणांमध्ये ChatGPT संवाद वैयक्तिक मानले गेले आहेत. पण एकंदरीत अजूनही या विषयावर स्पष्ट नियम तयार झालेले नाहीत. सध्या तरी तज्ज्ञांचा सल्ला आहे की, कायदेशीर प्रकरणात AI वर अवलंबून राहू नका आणि संवेदनशील माहिती शेअर करण्यापूर्वी वकिलांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news