US F-15 Jets Crash in Kuwait | कुवेतच्या 'फ्रेंडली फायर'मध्ये अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली!

कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाचा दुर्घटनेला दुजोरा, सर्व वैमानिक सुरक्षित असल्‍याचा दावा
US F-15 Jets Crash in Kuwait | कुवेतच्या 'फ्रेंडली फायर'मध्ये अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली!
Published on
Updated on

US F-15 Jets Crash in Kuwait

दोहा : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षावर आज (दि.२ मार्च) सकाळी कुवेतमध्ये अमेरिकेची तीन 'एफ-१५' (F-15) लढाऊ विमाने कोसळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने या दुर्घटनेला दुजोरा देत सर्व वैमानिक सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. दरम्‍यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या घटनेचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक लढाऊ विमान आगीच्या गोळ्यात रूपांतरित होऊन जमिनीवर कोसळताना दिसत आहे.

अमेरिकेचे लढाऊ विमाने कुवेतच्‍या हद्दीत कोसळली

कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आज सकाळी अमेरिकेची काही विमाने कोसळली आहेत. यातील सर्व क्रू मेंबर्स (वैमानिक) सुखरूप असून त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे." अपघातानंतर तातडीने शोध आणि बचाव मोहीम राबवून वैमानिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

US F-15 Jets Crash in Kuwait | कुवेतच्या 'फ्रेंडली फायर'मध्ये अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली!
Iran Supreme Leader successor | इराणमध्‍ये खामेनींचा वारसदार कोण ? सर्वोच्‍च नेत्‍याची निवड कशी होते? कोण आहेत दावेदार?

अपघाताचे कारण अस्पष्ट; इराणचा दावा

या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या दाव्यानुसार, ही विमाने कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या चुकीने झालेल्या हल्ल्यामुळे पाडण्यात आली असावीत. आखाती देशांवर सलग तिसऱ्या दिवशी हल्ले करणाऱ्या इराणने ही विमाने आपणच पाडल्याचा दावा केला आहे.

US F-15 Jets Crash in Kuwait | कुवेतच्या 'फ्रेंडली फायर'मध्ये अमेरिकेची तीन लढाऊ विमाने कोसळली!
Iran nuclear site attack | इराणच्या अणू केंद्रावर इस्रायलचा भीषण हल्ला; युद्ध भडकल्याने किरणोत्सर्गाचा धोका : 'IAEA'चा इशारा

दोहा शहरात भीषण स्फोटांचे आवाज

एकीकडे विमाने कोसळत असतानाच, कतारची राजधानी दोहा येथेही सोमवारी सकाळी भीषण स्फोटांचे आवाज ऐकू आले. वृत्तसंस्था 'एएफपी'ने दिलेल्या माहितीनुसार, या आवाजांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, या स्फोटांमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news