King Charles in rainfall | छत्री कुठे आहे? अँटिग्वामध्ये मुसळधार पावसात भिजले किंग चार्ल्स; स्टाफवर वैतागले (video)

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर विव्हियन रिचर्ड मैदानावर मुसळधार पावसाची हजेरी, स्टाफला वैतागून केली विचारणा
King Charles in rainfall | छत्री कुठे आहे? अँटिग्वामध्ये मुसळधार पावसात भिजले किंग चार्ल्स; स्टाफवर वैतागले
King Charles in rainfall | छत्री कुठे आहे? अँटिग्वामध्ये मुसळधार पावसात भिजले किंग चार्ल्स; स्टाफवर वैतागले
Published on: 
Updated on: 

Where’s the umbrella इंग्लडचे किंग चार्ल्स तिसरे हे २ नोव्हेंबर रोजी अँटिग्वा आणि बार्बुडाच्या ४५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रम सुरु असताना मुसळधार पावसास सुरवात झाली. यावेळी त्‍यांनी त्‍यांच्या स्फाफकडे छत्रीची मागणी केली पण कोणीही तत्‍काळ छत्री आणून दिली नाही, त्‍यामुळे ते स्टाफवर थोडेसे वैतागलेले दिसले. तर राणी कॅमिला या छत्रीची मागणी करताना दिसत होत्‍या. त्‍यांना लगेच छत्री मिळाली व त्‍या तिथून निघून गेल्या पण किंग चार्ल्स मात्र पावसात चांगलेच भिजलेले दिसले.

याबाबत अधिक माहिती अशी की अँटिग्वा आणि बार्बुडाच्या ४५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित लष्करी संचलनादरम्यान ही घटना घडली. व्हिडीओत ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तिसरे मुसळधार पावसात पूर्णपणे भिजल्याचे दिसत आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसात सुरुवातीला छत्री न मिळाल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना मिश्कील स्वरात विचारले, "छत्री कुठे आहे?" इतकेच नव्हे, तर "माझ्या पॅन्टवर आता पालेभाजी उगवेल इतका मी भिजलो आहे," असा हलकाफुलका टोलाही त्यांनी लगावला.

सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर स्वातंत्र्यदिनाचा भव्य सोहळा सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. यावेळी अँटिग्वाच्या अधिकृत प्रोटोकॉलनुसार राष्ट्रगीतादरम्यान सर्वांना एकाच जागी स्थिर उभे राहणे बंधनकारक होते. या नियमामुळे कर्मचाऱ्यांना तातडीने राजांपर्यंत छत्री पोहोचवता आली नाही आणि किंग चार्ल्स यांना काही वेळ पावसातच थांबावे लागले.

दुसरीकडे, क्वीन कॅमिला यांना लगेचच पारदर्शक छत्री उपलब्ध करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. राष्ट्रगीत संपल्यानंतर अखेर राजांच्या साहाय्यकाने त्यांच्यापर्यंत छत्री पोहोचवली. किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीसाठी (CHOGM) अँटिग्वा आणि बार्बुडाच्या दौऱ्यावर आले आहेत. मात्र, या दौऱ्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या या अनपेक्षित आणि हलक्याफुलक्या प्रसंगामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.