Karl Bushby incredible journey | २८ वर्षे २९ देश आणि सलग ५०,००० किलोमिटर चालत पूर्ण केली कार्ल बुशबी यांनी जगप्रदक्षिणा!

दक्षिण अमेरिकेच्या चिलीपासून सुरु झालेला २८ वर्षांचा अंखड प्रवास पूर्ण झाला इंग्लडमधील घरात, आधुनिक जगातील असा प्रवास करणारे पहिले व्यक्ति
Karl Bushby २८ वर्षापूर्वी व आत्ता
Karl Bushby २८ वर्षापूर्वी व आत्ता
Published on: 
Updated on: 

Karl Bushby Around the World आजच्या आधुनिक जगात प्रवासाची एवढी वेगवान साधने असून संपूर्ण जग जेवढे पूर्थ्वीवर भूभाग आहेत तेवढे पायी चालत पूर्ण करण्याचे अचाट साहस पर्ण करण्यात एक अवलिया यशस्वी ठरला आहे. तो म्हणजे इंग्लडचा धाडसी कार्ल बुशबी (Karl Bushby) वयाच्या २९ व्या वर्षी सुरु केलेला हा प्रवास ५६ व्या वर्षी थांबला आहे. या आपल्या ध्येयासाठी सलग २८ वर्षे निरंतर पायपीट करुन जगात विक्रम स्थापन केला आहे. या प्रवासत कोणतेही स्वयंचलीत अथवा इंधनावर चालणारे वाहन त्‍यांनी वापरले नाही.

गेल्या जवळपास तीन दशकांपासून संपूर्ण जग पायी तुडवणारे ब्रिटिश साहसी कार्ल बुशबी हे आधुनिक जगातील पहिलेच मानव ठरले आहेत. १ नाव्हेंबर २०२६ रोजी अखेर आपला प्रदीर्घ प्रवास पूर्ण केला. तब्बल ५०,००० किलोमीटरहून (३१,००० मैल) अधिक अंतर पायी पार करून ते इंग्लंडमधील ज्या घरात लहानाचे मोठे झाले, तिथे पोहोचले. त्यांनी कोणतीही गाडी, ट्रेन, विमान किंवा बोटीचा वापर न करता, पृथ्वीवर सलग पायी चालून प्रदक्षिणा पार केली. या मोहिमेला त्यांनी 'गोलायथ मोहीम' (Goliath Expedition) असे नाव दिले होते. ते जेव्हा इंग्लमध्ये आपल्या घरी पोहचले तेव्हा जिथे त्यांची आई, ३६ वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांची नात त्यांची वाट पाहत होते.

असा होता जगप्रवास

कार्ल बुशबी यांनी १ नोव्हेंबर १९९८ रोजी दक्षिण अमेरिकेतील चिली देशाच्या दक्षिण टोकावरील 'पुंता एरिनास' येथून ही पायी यात्रा सुरू केली. चिली, अर्जेंटिना, पेरू, इक्वाडोर आणि कोलंबिया पार केल्यानंतर मध्य अमेरिकेतून मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडा पार करत ते अलास्का येथे पोहोचले. मार्च २००६ मध्ये त्यांनी अमेरिकेतून रशियात प्रवेश करण्यासाठी अलास्का आणि रशिया दरम्यानची गोठलेली बेरिंग सामुद्रधुनी (Bering Strait) बर्फावरून चालत पार केली. पायी चालून हा समुद्र पार करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले.

रशियातील सायबेरियातील उणे ५० अंशांपर्यंतची थंडी आणि रशियातील व्हिसाचे कडक नियम यांमुळे त्यांचा प्रवास कित्येक वर्षे लांबला. रशिया पार करण्यासाठी त्यांना जवळपास १० वर्षे लागली. तिथून मध्य आशियात युक्रेन युद्धाच्या भौगोलिक अडचणी आणि मार्ग बदलांमुळे त्यांनी कॅस्पियन समुद्र ३१ दिवस पोहून पार केला. युरोपमधून प्रवास करत ते फ्रान्सला पोहोचले. फ्रान्समधून ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यासाठी 'इंग्लिश चॅनल' पायी पार करणे शक्य नसल्याने, त्यांनी ऑक्टोबर २०२६ मध्ये हा समुद्र पोहून पार केला आणि इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवले.

एक तंबू, काहीशे डॉलर्स आणि एक साधा प्लास्टिक कॅमेरा सोबत घेऊन त्यांनी १९९८ मध्ये चिलीतून प्रवासाला सुरुवात केली. तेथून उत्तर अमेरिकेकडे कूच करत त्यांनी अलास्कातून रशिया, मंगोलिया, चीन असा प्रवास केला आणि कॅस्पियन समुद्र पोहून पार करत युरोपमार्गे ते मायदेशी परतले.

सुरुवातीला हा प्रवास १० वर्षांत पूर्ण होईल असा त्यांचा अंदाज होता, परंतु वाटेत अनेक अनपेक्षित संकटे आली. पनामामध्ये त्यांना झालेला अल्पकालीन तुरुंगवास, मेक्सिकोमध्ये बंदूक दाखवून झालेली लूट आणि रशियात बेकायदेशीर सीमा ओलांडल्याचा आरोप ठेवून झालेली नजरकैद, यांसारख्या संकटांना त्यांना तोंड द्यावे लागले. याशिवाय २००८ चे जागतिक आर्थिक संकट आणि नंतर करोना महामारी यामुळेही त्यांचा प्रवास लांबला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.