जपानला 'शानशान' वादळाचा तडाखा, तीन जणांचा मृत्यू

Cyclone in Japan: हजारो लोकांना स्थलांतराचा सल्ला
Cyclone in Japan
जपानला 'शानशान' वादळाचा तडाखा, तीन जणांचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: जपानच्या दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू बेटावर 'शानशान' वादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचबरोबर घरांची छत उडाली, खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे दिसून आले. या वादळात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी हजारो लोकांना स्थलातरित करण्याचा सल्ला दिला आहे.

रात्री आठच्या सुमारास वादळ धडकले

जपानच्या हवामान खात्याने सांगितले की, शानशान हे शक्तिशाली वादळ सकाळी आठच्या सुमारास धडकले. ते ताशी 252 किलोमीटर वेगाने पुढे जात होते. त्याचवेळी, कागोशिमा प्रीफेक्चरच्या बहुतेक भागांसाठी विशेष टायफून चेतावणी जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि विमान उड्डाणे रद्द केली आहेत. हे वादळ जपानच्या उत्तरेकडे सरकत आहे.

Cyclone in Japan
जपानला 'शानशान' वादळाचा तडाखा

भूस्खलनामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

जपानमधील मध्य आयची प्रांतातील गामागोरी शहरात भूस्खलनामुळे एका कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला, असे स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मृतांमध्ये 70 वर्षीय दाम्पत्य आणि 30 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्याच वेळी, 40 वर्षांच्या दोन प्रौढ मुली वाचल्या. दक्षिण क्युशूच्या हवामान सेवेने शुक्रवार सकाळपासून 48 तासांत 1,100 मिलीमीटर (43 इंच) पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस

हवामान खात्याने पुढे सांगितले की, शुक्रवारपर्यंत पश्चिम जपानमध्ये मुसळधार पावसामुळे आपत्तीचा धोका झपाट्याने वाढू शकतो, त्यामुळे येथील लोकांना स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शानशान चक्रीवादळामुळे मंगळवारपासून जपानच्या मोठ्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे.

अडीच लाख लोक वीजेविना

क्यूशूच्या वीज विभागाने सांगितले की, 2,54,610 घरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. जपानच्या हवामान कार्यालयाने सांगितले की, कागोशिमामध्ये धोकादायक चक्रीवादळ आणि उंच लाटांचा विशेष इशारा देण्यात आला आहे. टायफून, जोरदार वारे आणि उंच लाटा, तसेच भूस्खलन, सखल भागात पूर येणे आणि दक्षिणी क्युशूमधील नद्या वाढल्याने सावधगिरी बाळगली गेल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news