इस्रायल- हिजबुल्लाह संघर्ष पेटला! बेरुतवर बॉम्बवर्षाव, मोठी जीवितहानी

Israel attacks Lebanon | हिजबुल्लाहच्या मुख्यालयाला केले टार्गेट
Israel attacks Lebanon
बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी हादरून गेली आहेत. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

इस्रायल आणि हिजबुल्लाह (Israel attacks Lebanon) यांच्यात संघर्ष पेटल्याने मध्य पूर्वेतील परिस्थिती चिघळली आहे. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतच्या (Beirut) दाट लोकवस्तीच्या भागात इराण समर्थक हिजबुल्लाह गटाच्या (Hezbollah group) मध्यवर्ती मुख्यालयाला शनिवारी टार्गेट केले. इस्रायलने हिजबुल्लाहचा सर्वोच्च नेता सय्यद हसन नसरल्लाह याला ठार मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. दरम्यान, बेरूतवरील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हेजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तर भागावर ६५ रॉकेट्स डागली असल्याची माहिती समोर आली आहे.

बेरूतची उपनगरे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी हादरली

बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरे इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी हादरून गेली आहेत. दरम्यान, इस्त्रायली सैन्याने पुष्टी केली की दहियेहमध्ये अनेक इमारतींवर हल्ला झाला. यामुळे येथे सगळीकडे धुराचे लोट दिसून आले आहेत. हा हिजबुल्लाहचा बालेकिल्ला मानला जातो. या हल्ल्यात चार इमारती उद्ध्वस्त झाल्या. तसेच शक्तिशाली स्फोटांनी शहर हादरले. या भागात अनेक मोठे खड्डे पडले असून आजूबाजूच्या इमारतींचे नुकसान झाले आहे.

लेबनॉनमध्ये ६ मृत्यू, ९१ जखमी

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने, या हल्ल्यात किमान ६ लोकांचा मृत्यू आणि ९१ जखमी झाल्याची माहिती दिली आहे. इस्त्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात हिजबुल्लाहचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. यात हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र युनिटचा प्रमुख मुहम्मद अली इस्माइल आणि त्याच्या उपप्रमुखाचा समावेश आहे. सोमवारपासून लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यात सुमारे ८०० लोक मारले गेले आहेत.

इस्रायलने शनिवारी सकाळी पूर्व आणि दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले, असे वृत्त अधिकृत लेबनीज नॅशनल न्यूज एजन्सी (LNE) ने दिले आहे.

बेरूतमधील रुग्णालये केली रिकामी

दरम्यान, इस्त्रायली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरातील रुग्णालये रिकामी केली जात असल्याचे लेबनॉनने म्हटले आहे. तर इस्रायलच्या लष्कराने म्हटले आहे की, जेट फायटरनी बेका व्हॅली आणि दक्षिण लेबनॉनच्या विविध भागात हिजबुल्लाहच्या डझनभर टार्गेट्सवर हल्ले केले आहेत आणि येते हल्ले सुरूच आहेत.

Israel attacks Lebanon
लेबनॉनसोबत युद्धबंदी करणार नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news