लेबनॉनसोबत युद्धबंदी करणार नाही

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा इशारा; हल्ले सुरूच
Israel-Lebanon Conflict
इस्रायलने लेबनॉनमधील युद्ध थांबवण्यास नकार दिला.Pudhari File Photo
Published on
Updated on

तेल अवीव; वृत्तसंस्था :

इस्रायलने लेबनॉनमधील युद्ध थांबवण्यास नकार दिला आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी सोशल मीडियावर ही माहिती दिली. दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉनकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. अमेरिका आणि फ्रान्सने युद्ध थांबवण्याची मागणी केली होती. तथापि, हिजबुल्लाहचाही नायनाट होईपर्यंत युद्ध सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. लष्कर पूर्ण ताकदीने लेबनॉनमध्ये लढत राहील,असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, हिजबुल्लाहने इस्रायलच्या राफेल लष्करी केंद्रावर 45 रॉकेट डागले आहेत. यात किती नुकसान झाले, हे अद्याप समजू शकलेले नाही. मागच्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये सुरू असलेला संघर्ष भीषण युद्धामध्ये बदलण्याची चिन्ह आहेत. सुरुवातीला दोन्ही बाजूंकडून परस्परांवर मिसाईल आणि रॉकेट हल्ले झाले. यात बुधवारी 72 जणांचा मृत्यू झाला.

लेबनॉनमधील भारतीयांना मायदेशी परतण्याच्या सूचना

इस्रायल आणि लेबनॉनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीयांसाठी अलर्ट जारी केला. नव्या मार्गदर्शिकेनुसार लेबनॉनमधील भारतीयांना मायदेशी परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले डागण्यास सुरुवात केली आहे. लेबनॉनमधील सुमारे 1600 ठिकाणी हल्ले करण्यात आले असून, 550 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लेबनॉनमधील भारतीयांसाठी अलर्ट जारी केला असून, खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय तत्काळ मायदेशात परतण्याबाबत सूचनाही जारी केली आहे. दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने लेबनॉनमध्ये भारतीयांना न जाण्याबाबत सल्ला दिला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news