मोठी बातमी : इस्रायलने मध्‍य गाझातून केली चार ओलिस नागरिकांची सुटका

हमासच्या बंदिवासात असलेल्या चार इस्रायली नागरिकांची मध्यवर्ती गाझा पट्टीतून विशेष मोहिम राबवून सुटका करण्‍यात आल्‍याची माहिती इस्रायलच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
हमासच्या बंदिवासात असलेल्या चार इस्रायली नागरिकांची मध्यवर्ती गाझा पट्टीतून विशेष मोहिम राबवून सुटका करण्‍यात आल्‍याची माहिती इस्रायलच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हमासच्या बंदिवासात असलेल्या चार इस्रायली नागरिकांची मध्यवर्ती गाझा पट्टीतून विशेष मोहिम राबवून सुटका करण्‍यात आल्‍याची माहिती इस्रायलच्‍या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

नोआ अर्गामनी (वय २५), अल्मोग मीर जान (२१), आंद्रे कोझलोव्ह (२७) आणि स्लोमी झिव्ह (४०) अशी सुटका करण्यात आलेल्या ओलिसांची नावे आहे. ७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासच्या इस्‍त्रायलवर हल्‍ला केला होता. यावेळी या चौघांचे अपहणर करण्‍यात आले होते, असे वृत्त द टाइम्स ऑफ इस्रायलने दिले आहे.

ओलिसांच्‍या सुटकेसाठी इस्रायल पोलिसांनी नुसीरतच्या मध्यभागी असलेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून विशेष शोध मोहिम राबवली. चार ओलिसांची सुटका करण्‍यात यश मिळाले. त्‍यांच प्रकृती चांगली आहे. त्‍यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना 'शेबा' टेल-हाशोमर मेडिकल सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.

इस्‍त्रायलच्‍या विशेष शोध मोहिमेत शिन बेट आणि यमाम ब्रिगेडने नुसरतमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ओलिसांची सुटका केली, असे जेरुसलेम पोस्टने वृत्त दिले आहे. ओलिसांची प्रकृती चांगली असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना शेबा मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांचा इस्रायल दौरा ठरणार महत्त्‍वपूर्ण

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन सोमवार १० जूनपासून इजिप्त, इस्रायल, जॉर्डन आणि कतार या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेच्‍या स्टेट डिपार्टमेंटचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्‍हटलं आहे की, "सर्व ओलिसांची सुटका सुनिश्चित करणाऱ्या मित्र देशांसोबत युद्धविराम करारावर पोहोचण्याच्या गरजेवर मंत्री चर्चा करतील. युद्धविराम प्रस्तावामुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोघांना मिळणाऱ्या फायद्यांवर मंत्री चर्चा करतील. या माध्‍यमातून मानवतावादी मदत वाढेल आणि पॅलेस्टिनींना त्यांच्या मायदेशी परत जाण्याची परवानगी मिळेल.."

युद्धबंदीवर अद्याप एकमत नाही

इस्रायल किंवा हमास या दोघांनीही युद्धविराम नवीन प्रस्तावाला अद्याप सहमती दिलेली नाही. यामध्‍ये सहा आठवड्यांसाठी संपूर्ण युद्धविराम आणि दुसऱ्या टप्प्यात कायमस्वरूपी युद्धविराम करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युद्धविराम आणि इस्रायलमधील पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात दहशतवादी गटाने ताब्यात घेतलेल्यांची सुटका करण्यासाठी कतार, अमेरिका आणि इजिप्त अनेक महिन्यांपासून इस्रायल आणि हमासमध्ये मध्यस्थी करत आहेत.७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी सुरु झालेल्‍या हमासने केलेल्‍या हल्‍ल्‍यास इस्‍त्रायलने दिलेल्‍या प्रत्‍युत्तर आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक नागरिक मृत्‍यूमुखी पडले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news