लेबनॉनमधील हमासचा म्‍होरक्‍या हवाई हल्‍ल्‍यात ठार

इस्‍त्रायलच्‍या लष्‍कराचा दावा
 Israel-Hezbollah Conflict
प्रातिनिधिक छायाचित्र(Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हवाई हल्‍ल्‍यात लेबनॉनमधील हमासचा म्‍होरक्‍या फताह शेरीफ ठार झाला आहे, असा दावा इस्‍त्रायलच्‍या लष्‍कराने केला आहे.

IDFने आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, लेबनॉनमध्‍ये केलेल्‍या हवाई हल्‍ल्‍यात हमास या दहशतवादी संघटनेचा लेबनॉनमधील म्‍होरक्‍या फतेह शेरीफ हा ठार झघला आहे. शेरीफ हा लेबनॉनमधील हमासच्या दहशतवादी कारवायामध्‍ये सहभागी होताच. त्‍याबराबेर लेबनॉनमध्ये संघटनेत तरुणांची भरती आणि शस्त्रे मिळवण्यासाठीही तो प्रयत्‍नशील होता. फताह शेरीफ हा मान्यताप्राप्त युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सीचा सदस्‍यही होता. लेबनॉनमधील युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी टीचर्स असोसिएशनचेही प्रमुख होता. इस्त्राईलच्या नागरिकांना धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात आमची कारवाई सुरुच राहिल, असेही इस्‍त्रायलच्‍या लष्‍कराने म्‍हटलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news