पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel-Hezbollah war | लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील उपनगरांवर गेल्या २४ तासांत इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये ४० लोकांचा मृत्यू झाला. तत्पुर्वी शनिवारी दक्षिणेकडील लेबनीज बंदर शहर टायरवर इस्त्रायली हवाई हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.
लेबनॉनवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. बेरूत शहरात झालेल्या हल्ल्यात ४० हून अधिक लोक ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायल हिजबुल्लाच्या ठिकाणांवर सातत्याने हल्ले करत आहे. या हल्ल्यात ४० जणांचा मृत्यू झाला होता. इस्रायली लष्कराने यापूर्वी शहरातील अनेक भाग रिकामे करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, हौथी बंडखोरांनी 'बॅलिस्टिक मिसाईल'ने इस्रायलच्या नेवाटीम एअरबेसला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. त्यांनी येमेनच्या अल-जॉफ प्रांतात अमेरिकन 'एमक्यू-9 रीपर' ड्रोन पाडले आहे. गाझा पट्टीतील हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ, आम्ही नेवातीम हवाई तळाच्या दिशेने हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागले. क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचले, असे हुथी लष्करी प्रवक्ते याह्या सारिया यांनी प्रसारित केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.