Israel Air Strikes Gandhi Hospital: इस्त्रायलनं गांधी हॉस्पिटलवर टाकला बॉम्ब... Video आला समोर

Israel Air Strikes Gandhi Hospital
Israel Air Strikes Gandhi Hospitalpudhari photo
Published on
Updated on

Israel Air Strikes Gandhi Hospital: इस्त्रायलने इराणवर हल्ला करून युद्धाला तोंड फोडलं होतं. त्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनई यांची हत्या केल्यानं इराणनं देखील इस्त्रायलसह अमेरिकेची लष्करी तळे असलेल्या ठिकाणी हल्ले सुरू केले आहेत. इस्त्रायलने देखील इराणच्या अनेक ठिकाणांना टार्गेट केलं. विशेष म्हणजे इस्त्रायलनं रविवारी तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवर एअर स्ट्राईक केला.

इराणच्या ISNA न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार इस्त्रायल आणि अमेरिकेनं रूग्णालयावर एअर स्ट्राईक केला आहे. तसेच फारस आणि मिझान न्यूजने या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज देखील शेअर केलं आहे. स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या रूग्णालयातील उपकरणांचे अवशेष विखुरलेले दिसत आहेत.

दोन साक्षीदारांनी गांधी स्ट्रीटवरून रायटर्सला दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात रूग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर रूग्णांना तेथून बाहेर काढत आहेत.

इस्त्रायलने रविवारी रात्री देखील तेहरानवर हवाई हल्ले सुरूच ठवले. इस्त्रायलने तेहरानच्या मध्यवर्ती भागात हल्ल्याचे आदेश दिल्याचे सांगितलं. इराणनं इस्त्रायलवर मिसाईल आणि ड्रोनने हल्ले केल्यानंतर ही करावाई करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. इराणने इस्त्रायल, गल्फमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर, सैदी अरेबियाच्या राजधानी आणि दुबईवर हल्ले केले आहेत.

यापूर्वी इराणने तीन सदस्यांच्या लीडरशीप काऊन्सीलची नियुक्ती करण्यात आली आहे. यात राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कीन, न्याय विभागाचे प्रमुख गुलाम हुसैन मोहसेनी इजेही आणि आयतोल्ला अली रझा अरफी यांचा सामावेश आहे.

दरम्यान, इस्त्रायल डिफेन्स फोर्स प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेवेळी १०० फायटर जेट्सनिशी आम्ही तेहरानच्या अनेक सरकारी साईट्वर एकाचवेळी हल्ला केल्याचे सांगितलं.

या हल्ल्यात इराणच्या एअर फोर्सशी संबंधित मिसाईल कमांड, ज्यांनी गेल्या महिन्यातील आंदोलन दडपण्याचं काम केलं अशा अंतर्गत सुरक्षा फोर्सेसच्या ठिकाणांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news