Iran Israel War
बेरूतमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला; चौघे ठार

Iran Israel War : बेरूतमध्ये इस्रायलचा हवाई हल्ला; चौघे ठार

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या कमांडर्सना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा
Published on

बेरूत : लेबनॉनची राजधानी बेरूतच्या मध्यभागातील एका हॉटेलवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान चार जणांचा मृत्यू झाला असून, दहा जण जखमी झाले आहेत, अशी माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. या हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या कमांडर्सना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

राऊशे परिसरातील हॉटेलवर हल्ला

रविवारी पहाटे बेरूतमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ राऊशे येथे असलेल्या एका हॉटेलच्या खोलीवर इस्रायली हवाई हल्ला झाला. या परिसरात भूमध्य समुद्रकिनाऱ्यालगत अनेक हॉटेल्स असून सध्या युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांनी येथे आश्रय घेतला आहे. हल्ल्यानंतर भीतीमुळे अनेक लोकांनी हॉटेलमधून बाहेर पडण्यास सुरुवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news