Iran–US Tensions | इराणचा मोठा इशारा! यूएईमधील रहिवाशांना बंदरे आणि अमेरिकन लष्करी तळ सोडण्याचे आवाहन

Iran warns UAE over US military bases | खर्ग बेटावरील अमेरिकेच्‍या हल्‍ल्‍यानंर दोन्‍ही देशांमधील तणाव वाढला
Iran–US Tensions | इराणचा मोठा इशारा! यूएईमधील रहिवाशांना बंदरे आणि अमेरिकन लष्करी तळ सोडण्याचे आवाहन
Published on
Updated on

Iran warns UAE over US military bases

तेहरान : इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) युनायटेड अरब अमिरातीला (UAE) गंभीर इशारा दिला आहे. इराणच्या खर्ग बेटावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला असून, इराणने आता युएईमधील अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा दिला आहे.

अमेरिकन लष्करी तळ इराणच्या निशाण्यावर

इराणच्या लष्करी मध्यवर्ती कमांडने ('खातम अल-अंबिया') सरकारी टीव्हीवरून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराणवर होणारे हल्ले थांबले नाहीत, तर युएईमधील अमेरिकन लष्करी तळ आणि तिथल्या पायाभूत सुविधांना 'कायदेशीर लक्ष्य' मानले जाईल.आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे आणि भूप्रदेशाचे रक्षण करण्यासाठी शत्रू राष्ट्राच्या लष्करी ठिकाणांवर प्रतिहल्ला करणे हा त्यांचा वैध अधिकार असल्‍याचेही इराणने म्‍हटलं आहे.

Iran–US Tensions | इराणचा मोठा इशारा! यूएईमधील रहिवाशांना बंदरे आणि अमेरिकन लष्करी तळ सोडण्याचे आवाहन
Israel Iran conflict | 'इस्लामिक रिव्होल्युशनरी'चा कमांडर ठार, इराणच्‍या ‘तालेघन’ अणू केंद्रावरही हल्ला : इस्रायलचा दावा

नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इराणने युएईमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि रहिवाशांना सतर्क केले आहे. बंदरे, धक्के (Docks) आणि ज्या भागात अमेरिकन सैन्याचे तळ आहेत, अशा ठिकाणांपासून तात्काळ दूर राहावे किंवा ती ठिकाणे रिकामी करावीत, असे आवाहन इराणी लष्कराने केले आहे. अमेरिकन क्षेपणास्त्रे आणि लष्करी हालचाली असलेल्या भागांपासून सामान्य नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे, असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Iran–US Tensions | इराणचा मोठा इशारा! यूएईमधील रहिवाशांना बंदरे आणि अमेरिकन लष्करी तळ सोडण्याचे आवाहन
Iran US war | "अमेरिकेशी चर्चा नाही..." : युद्धाबाबत दिवंगत खामेनींच्या वरिष्ठ सल्लागारांनी केले मोठे विधान

इस्रायलवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; जेरुसलेममध्ये स्फोटांचे आवाज

इराणकडून डागलेली क्षेपणास्त्रे इस्रायलच्या हद्दीत शिरल्याने आज जेरुसलेम शहरात स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आले. इस्रायली सैन्याने या हल्ल्याची आधीच पूर्वकल्पना दिली होती. अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने एकत्रितपणे इराणची राजधानी तेहरानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता संघर्ष तिसर्‍या आठवड्यातही कायम आहे. इराणकडून येणारा हा धोका रोखण्यासाठी इस्रायलची एअर डिफेन्स यंत्रणा (हवाई सुरक्षा यंत्रणा) सध्या सक्रियपणे काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news