Iran warning Gulf countries | सुरक्षा हवी असेल तर तुमची भूमी युद्धासाठी वापरू देऊ नका

आखाती शेजारी देशांना इराणचा इशारा
Iran warning Gulf countries |
इराण राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : तुम्हाला विकास आणि सुरक्षा हवी असेल तुमच्या भूमीचा वापर अमेरिका आणि इस्रायलला युद्धासाठी करून देऊ नका, असे इशारेवजा आवाहन इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी आपल्या शेजारी देशांना केले आहे.

इस्रायल-अमेरिकेचे इराणविरोधातील युद्ध सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आखाती प्रदेशातील अनेक देश या युद्धात होरपळत आहेत. या पार्श्वभूमीवर पेझेशिक्यन यांनी हे आवाहन केले आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, कुवेत, कतार यांसारखे या प्रदेशातील अनेक देश या युद्धात अडकले आहेत. अमेरिका आखाती देशांमधील आपल्या लष्करी तळांचा वापर करून इराणवर हल्ले करत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही याच देशांवर हल्ले करण्यात येत आहेत.

‘मी अनेकदा सांगितले आहे की, इराणने ही सुरुवात केलेली नाही किंवा पूर्वनियोजित हल्ले करत नाही; परंतु जर आमच्या पायाभूत सुविधा किंवा आर्थिक केंद्रांना लक्ष्य केले गेले, तर आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ,’ असे पेझेश्कियन यांनी एक्सेंवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

विश्वास दिला पाहिजे; शरीफ यांच्याशी चर्चा

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पेझेश्कियन यांच्याशी चर्चा केली. मात्र युद्धावर चर्चा करण्यासाठी विश्वास आवश्यक असल्याचे पेझेश्कियान यांनी म्हटल्याचे सांगितल्याचे वृत्तसंस्था रॉयटर्सने म्हटले आहे. शरीफ यांच्या कार्यालयाने असेही म्हटले आहे की, पेझेश्कियान यांनी युद्ध संपवण्यासाठी पाकच्या शांतता प्रयत्नांचे कौतुक केले. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा घडविण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थ म्हणून पुढे आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news