Iran-US War : इराणकडून अमेरिकेला ‌‘हवाई धक्का‌’, ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’मध्ये 42 युद्धविमाने पाडल्याचा अधिकृत अहवाल

Iran-US War : इराणकडून अमेरिकेला ‌‘हवाई धक्का‌’, ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’मध्ये 42 युद्धविमाने पाडल्याचा अधिकृत अहवाल
Published on
Updated on

वॉशिंग्टन : इराणविरुद्ध सुरू असलेल्या ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’ या लष्करी मोहिमेत अमेरिकन हवाई दलाला मोठा तडाखा बसला आहे. या मोहिमेदरम्यान अमेरिकेची लढाऊ विमाने आणि ड्रोन्ससह तब्बल 42 विमानांचे मोठे नुकसान झाले असून, काही विमाने नष्ट झाली आहेत. अमेरिकेच्या काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसने (सीआरएस) सादर केलेल्या अधिकृत अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‌‘सीआरएस‌’ या अमेरिकन संसदेला धोरणात्मक व कायदेशीर विश्लेषण पुरवणाऱ्या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे. संरक्षण विभाग आणि यूएस सेंट्रल कमांडने जारी केलेली विधाने तसेच विविध बातम्यांच्या आधारे हा डेटा संकलित करण्यात आला आहे. मात्र, सध्या सुरू असलेली युद्धस्थिती, विमानांचे वर्गीकरण आणि पडताळणी प्रक्रियेमुळे या नुकसानीच्या आकड्यात भविष्यात आणखी वाढ किंवा बदल होऊ शकतो, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

‌‘ही‌’ विमाने पाडली; अमेरिकेचे हवाई नुकसान

अमेरिकेच्या हवाई दलाचे मोठे नुकसान झाले असून, त्यात चार एफ-15 ई स्ट्राईक ईगल जेट. एक एफ-35 ए लाईटनिंग, 2 फायटर जेट, एक ए-10 थंडरबोल्ट ग्राऊंड अटॅक विमान, सात केसी-135 स्ट्रटो टँकर एअर रिफ्युलिंग विमान, एक ई-3 सेंट्री वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीम एअरक्राफ्ट, एक एचएच-60 डब्ल्यू जॉली ग्रीन हेलिकॉप्टर, 24 एमक्यू रिपर ड्रोन आणि एमक्यू-4 ट्रीटन ड्रोन यांचा समावेश आहे.

अब्जावधी डॉलर्सचा अतिरिक्त बोजा

या मोहिमेवर होणाऱ्या प्रचंड आर्थिक खर्चामुळे अमेरिकेत आतापासूनच तीव्र चर्चा सुरू झाली आहे. 12 मे रोजी झालेल्या हाऊस अप्रोप्रिएशन्स सबकमिटीच्या सुनावणीदरम्यान ‌‘पेंटागॉन‌’चे कार्यवाह नियंत्रक ज्युल्स डब्ल्यू. हर्स्ट यांनी वाढत्या खर्चावर चिंता व्यक्त केली. लष्करी उपकरणांची दुरुस्ती आणि नवीन विमाने खरेदी करण्याच्या अंदाजित खर्चामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या अंदाजानुसार, इराणमधील लष्करी मोहिमेचा खर्च आता तब्बल 29 अब्ज डॉलर्सवर (सुमारे 2.4 लाख कोटी रुपये) पोहोचला आहे.

1) 42 विमानांचे नुकसान : 28 फेब्रुवारी रोजी इराणविरुद्ध सुरू झालेल्या ‌‘ऑपरेशन एपिक फ्युरी‌’मध्ये अमेरिकेची 42 विमाने नष्ट किंवा खराब झाली आहेत.

2) आधुनिक विमानांचा समावेश : गमावलेल्या विमानांमध्ये 4 एफ-15 ई स्ट्राईक ईगल, 1 एफ-35 ए लाईटनिंग आणि 24 एमक्यू-9 रिपर ड्रोन्सचा समावेश आहे.

3) लष्करी खर्चात प्रचंड वाढ : ‌‘पेंटागॉन‌’च्या अंदाजानुसार, विमानांच्या दुरुस्ती आणि बदली खर्चामुळे इराणमधील मोहिमेचा एकूण खर्च आता 29 अब्ज डॉलर्सवर गेला आहे.

4) माहितीमध्ये बदलाची शक्यता : युद्धभूमीवरील चालू घडामोडी आणि अधिकृत वर्गीकरणामुळे विमानांच्या नुकसानीचा हा आकडा सुधारित केला जाऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news