Iran US tensions | ...तर अमेरिकेचे तळ उद्ध्वस्त करू

जहाजांवर हल्ला केल्याने इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्चा इशारा
Iran US tensions |
दोहा : कतारच्या सीमेजवळ मालवाहू जाहजावर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. त्यात जहाजाला आग लागली
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकेने इराणच्या तेलवाहू जहाजांना (टँकर्सना) लक्ष्य केले, तर मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर आणि त्यांच्या जहाजांवर भीषण हल्ला केला जाईल, असा थेट इशारा इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस्ने अमेरिकेला दिला आहे.

अमेरिकन लढाऊ विमानांनी इराणच्या दोन टँकर्सवर हल्ला करून ते निकामी केले होते. अमेरिकेच्या मते, ही जहाजे नाकेबंदीचे उल्लंघन करत होती. या घटनेनंतर इराणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी सकाळी कतारच्या किनारपट्टीजवळ एका मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्राने हल्ला झाल्याची माहिती यूके मॅरिटाईम ट्रेड ऑपरेशन्सने दिली आहे. हे जहाज ब्रिटनचे होते. या हल्ल्यामुळे जहाजाला किरकोळ आग लागली होती. ती नंतर विझविण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शांततेचा प्रस्ताव पाठवला असून त्यावर लवकरच उत्तर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. एकीकडे मुत्सद्देगिरीच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे शस्त्रसंधीचे उल्लंघन करायचे, यामुळे अमेरिकेच्या गांभीर्याबद्दल शंका निर्माण होत आहे, असे अराघची यांनी म्हटले आहे.

खार्ग भोवती तेल गळती

इराणचे मुख्य तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटाच्या पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात तेलगळती झाल्याचे उपग्रहाद्वारे समोर आले आहे. ऑर्बिटल ईओएस या जागतिक संस्थेच्या मते, ही तेलगळती साधारण 52 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरली आहे. ब्रिटनस्थित कॉन्फ्लिक्ट अँड एन्व्हायर्नमेंट ऑब्झर्व्हेटरीने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या तेल पायाभूत सुविधांमधून ही गळती झाली असावी. मात्र शनिवारी याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news