Iran Attacks Israel | इराणने इस्रायलवर डागली २०० क्षेपणास्त्रे; युद्ध भडकण्याची चिन्हे

अमेरिकेचाही इराणला इशारा, बायडन यांचे सैन्याला आदेश
Iran Attacks Israel
इराणने इस्रायलवर डागली २०० क्षेपणास्त्रे; युद्ध भडकण्याची चिन्हेfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने (Iran) इस्रायलवर मंगळवारी रात्री १० वाजता २०० हून अधिक क्षेपणास्त्रे (missile attack) डागली. इराणच्या क्षेपणास्त्रांनी मोसादचे मुख्यालय, इस्त्रायली हवाई तळ F-35 लढाऊ विमाने यांना लक्ष्य केले. हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणला गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा इशारा दिला असून अध्यक्ष जो बायडेन यांनी इराणची क्षेपणास्त्रे उध्वस्त करण्याचे आदेश अमेरिकन सैन्याला दिले आहेत. (Iran Attacks Israel)

दमास्कसमधील इराणी वाणिज्य दूतावासावर झालेल्या प्राणघातक इस्रायली हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून एप्रिलमध्ये क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर केलेला हा दुसरा हल्ला होता. हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह आणि इराणी ब्रिगेडियर जनरल अब्बास निलफोरुशन गेल्या आठवड्यात इस्रायली हवाई हल्ल्यात मारले गेले. तसेच जुलैमध्ये तेहरानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हमास नेता इस्माइल हनीह यांच्या मृत्यूला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचे इराणने म्हटले आहे. इराणकडून अचानक असे काही घडेल, याची गुप्त खबर इस्रायलला मिळालेली होती. त्यामुळे या हल्ल्यांपूर्वीच तेल अवीवसह देशभरात नागरिकांनी सतर्क राहावे, बॉम्ब शेल्टरमध्ये आसरा घ्यावा म्हणून सायरन वाजवले गेले होते. अमेरिकेनेही इराणकडून असा हल्ला शक्य असल्याचा इशारा दिलेला होता. इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर आता अमेरिकेने इराणला गंभीर परिणाम भोगण्यास तयार राहावे, असा इशारा दिला आहे.

जो बायडेन यांचे अमेरिकन सैन्याला आदेश

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मंगळवारी अमेरिकन सैन्याला इस्रायलच्या संरक्षणासाठी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलला लक्ष्य करणारी इराणी क्षेपणास्त्रे उध्वस्त करण्यासही त्यांनी सांगितले आहे. बायडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस इस्रायलवरील इराणच्या हल्ल्यावर लक्ष ठेवून आहेत. बायडेन यांनी राष्ट्रीय सुरक्षा टीमची बैठक बोलावली होती. या बैठकीत इराणच्या इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत चर्चा करण्यात आली. इराणच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी आणि इस्रायलमधील अमेरिकन कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यास मदत करण्यासाठी युनायटेड स्टेट्स कशी तयारी करत आहे, याबाबत त्यांनी माहिती घेतली. (Iran Attacks Israel)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news