iran israel war ceasefire: ही कसली शस्त्रसंधी... इराणनं पुन्हा बंद केलं होर्मुझ; इस्त्रायलनं फायर केली १०० क्षेपणास्त्रे

iran israel war ceasefire
iran israel war ceasefirepudhari
Published on
Updated on

iran israel war ceasefire breaks: पाकिस्तानच्या मध्यस्थीनं जाहीर करण्यात आलेली अमेरिका-इराण-इस्त्रायल शस्त्रसंधीला इस्त्रायलनं २४ तासात वाटाण्याच्या अक्षता लावल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत १५ दिवसाची शस्त्रसंधी जाहीर केली. त्यावेळी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करण्यास मान्यत दिली. मात्र इस्त्रायलने लेबनॉनवर पुन्हा हल्ला केल्यानं इराणने पुन्हा होर्मुझ सामुद्रधुनी बंदी केल्याचे एसोसिएट प्रेसने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

iran israel war ceasefire
Netanyahu On Ceasefire: लेबनॉनचा समावेश नाही.... नेतान्याहूंनी पाकिस्तानच्या शरीफांची केली गोची; इस्त्रायलचा वेगळाच प्लॅन?

पुन्हा हॉर्मुझ झालं बंद

इराण आणि अमेरिकेने बुधवारी दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर केली. या शस्त्रसंधीचा भाग म्हणून इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा ओपन केली होती. यामुळं जागतिक ऊर्जा पुरवठा सुरूळीत होणार होता. मात्र इस्त्रायलच्या मनात काही वेगळंच होतं. इस्त्रायलच्या लष्कराने लेबनॉनवर १० मिनिटात तब्बल १०० क्षेपणास्त्रे दागली.

दरम्यान, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी जाहिररित्या अमेरिकेच्या शस्त्रसंधीचे समर्थन केले होते. मात्र इराणने या शस्त्रसंधींच्या अटीत लेबनॉनचा समावेश नाही असं स्पष्ट केलं होतं.

iran israel war ceasefire
Iran US Ceasefire Document: सीजफायर कागदपत्रात इराणनं केली मोठी चलाखी, अमेरिकेने मान्य केला 'तो' प्रस्ताव?

इस्त्रायलची आगळीक

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सगळीकडे शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर नेतान्याहूंनी लेबनॉनबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याला आता क्षेपणास्त्र हल्ला करून कृतीत उतरवली आहे. यामुळं अमेरिका-इराण शस्त्रसंधीवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

iran israel war ceasefire
Israel Iran conflict | 'इस्लामिक रिव्होल्युशनरी'चा कमांडर ठार, इराणच्‍या ‘तालेघन’ अणू केंद्रावरही हल्ला : इस्रायलचा दावा

पाकिस्तानवर विश्वास नाही

इस्त्रायलमधून अमेरिकेने या शस्त्रसंधीवेळी आपल्याला विश्वासात घेतलं नाही. अगदी शेवटच्या टप्प्यात शस्त्रसंधीबाबत सांगितल्याचा आरोप केला. तसेच इस्त्रायलने पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून भूमिका देखील अमान्य केली असून पाकिस्तान विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही असं सांगितलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news