Israel US Iran War | इराणमध्ये मुलींच्या शाळेवरील हल्ला अमानुष

युनोच्या मानवाधिकार संघटनेकडून चौकशीची मागणी
Israel US Iran War
इराणमध्ये मुलींच्या शाळेवरील हल्ला अमानुष
Published on
Updated on

जीनिव्हा/इस्तंबूल ः अमेरिका आणि इस्रायल यांनी गेल्या शनिवारी दक्षिण इराणमधील एका शाळेवर केलेल्या हल्ल्यात 165 हून अधिक मुलींचा मृत्यू झाल्याची घटना अमानुष असून, याची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने केली आहे.

संघटनेचे प्रमुख वोल्कर टर्क यांनी सांगितले की, गेल्या शनिवारी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेच्या चौकशीची जबाबदारी हल्ला करणाऱ्या शक्तींवर आहे. यातील पीडितांना योग्य ती भरपाई देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. हे हल्ले निश्चितपणे टाळता आले असते, याबद्दल आमची खात्री पटली आहे.

यातून जागतिक परिस्थिती दोलायमान बनली आहे. त्यामुळे आम्ही काळजीत पडलो आहोत. मध्य पूर्व आशियातील परिस्थिती असे हल्ले करण्याएवढी टोकाला गेली नव्हती. या युद्धादरम्यान निष्पाप विद्यार्थिनींना लक्ष्य करण्यात आले, ही बाब आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचेही टर्क यांनी स्पष्ट केले. जगभरातील शांतताप्रेमी आणि मानवतावादी समर्थकांनी या हल्ल्याचा कठोर शब्दांत धिक्कार केल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

जगभरातून हल्ल्याची निर्भत्सना

आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार, रुग्णालये आणि शाळांना कोणत्याही युद्धादरम्यान लक्ष्य केले जात नाही. मात्र, इराणमधील घटनेवेळी हे संकेत धाब्यावर बसवले गेले. त्यामुळेच संपूर्ण जगातून या हल्ल्याची निर्भत्सना करण्यात आली. त्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news