Minab School Missile Attack | अमेरिकेच्या ‘त्या’ नौदल अधिकाऱ्यांना शोधून काढू

मिनाब शाळेवरील हल्ल्याप्रकरणी इराणची धमकी
Minab School Missile Attack |
Minab School Missile Attack | अमेरिकेच्या ‘त्या’ नौदल अधिकाऱ्यांना शोधून काढू
Published on: 
Updated on: 

तेहरान/वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : इराणने मिनाब येथील प्राथमिक शाळेवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याप्रकरणी दोन अमेरिकी नौदल अधिकाऱ्यांना थेट धमकी दिली आहे. या हल्ल्यात १६८ मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला असून, त्यासाठी अमेरिकी नौदलाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरत इराणने त्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक केली आहेत. ‘आम्ही तुम्हाला शोधून काढू,’ असा इशारा इराणच्या दक्षिण आफ्रिकेतील दूतावासाने समाजमाध्यमांवर दिला आहे.

या अधिकाऱ्यांनी हल्ल्याचा आदेश दिल्याचा दावा

१४ नोव्हेंबर रोजी दूतावासाने केलेल्या पोस्टमध्ये यूएसएस स्प्रूअन्स या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर कमांडर लेई आर. टेट आणि कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कमांडर जेफ्री ई. यॉर्क यांची नावे नमूद करण्यात आली आहेत. इराणच्या आरोपानुसार, २८ फेब्रुवारी रोजी मिनाब येथील प्राथमिक शाळेवर झालेल्या टॉमहॉक क्षेपणास्त्र हल्ल्याचे निर्देश या दोन्ही अधिकाऱ्यांनी दिले होते. इराणच्या दूतावासाने यापूर्वीही या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले होते. २८ मार्च रोजी केलेल्या पोस्टमध्ये त्यांना ‘गुन्हेगार’ संबोधत, ‘त्यांना स्वतःची मुले नाहीत का?’ असा सवाल केला होता. या हल्ल्यात किमान १६८ मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप इराणने केला आहे.

दरम्यान, यूएसएस स्प्रूअन्स ही युद्धनौका शुक्रवारी सॅन डिएगो येथे परतली. इराणी सैन्याविरोधातील लष्करी कारवायांसह या नौकेने ३५७ दिवसांची तैनाती पूर्ण केली होती. या पार्श्वभूमीवर अमेरिकी नौदल अधिकाऱ्यांची नावे आणि छायाचित्रे सार्वजनिक करून धमकी दिल्याने त्यांच्या सुरक्षेबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प यांचीही धमकी...

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणला कठोर इशारा दिला. १२ नोव्हेंबर रोजी रेडिओ कार्यक्रमात बोलताना, इराणने एखाद्या वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यात यश मिळवले, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असे त्यांनी म्हटले. ‘ते फार काळ अस्तित्वात राहणार नाहीत,’ अशा शब्दांत ट्रम्प यांनी संभाव्य प्रत्युत्तराचा इशारा दिला.

अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी निवासस्थान सोडले

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनाही मृत्यूच्या धमक्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांनी वॉशिंग्टन परिसरातील निवासस्थान सोडून लष्करी तळावर स्थलांतर केले. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.