China Iran petroyuan system | इराण-चीनची ‘पेट्रोयुआन’ चाल; डॉलर वर्चस्वाला मोठे आव्हान

युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक समीकरणे बदलण्याचे संकेत
China Iran petroyuan system |
China Iran petroyuan system | इराण-चीनची ‘पेट्रोयुआन’ चाल; डॉलर वर्चस्वाला मोठे आव्हान
Published on
Updated on

बिजिंग : वृत्तसंस्था : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध दोन आठवड्यांसाठी थांबले असले, तरी जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम अजूनही तीव्र आहेत. या परिस्थितीत इराण आणि चीन यांनी एकत्र येत अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची रणनीती पुढे आणली आहे.

Summary
  • इराण-चीन युतीने डॉलरविरोधात ‘पेट्रोयुआन’ला चालना

  • होर्मुझ सामुद्रधुनीत युआनमध्ये शुल्क आकारण्यास सुरुवात

  • चीनकडे इराणच्या 80% तेल निर्यातीचा प्रवाह कायम

  • डॉलरचे वर्चस्व अद्याप मजबूत; पण हळूहळू आव्हान वाढतेय

दीर्घकाळापासून आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलरचे वर्चस्व आहे. विशेषतः, तेल बाजारात सुमारे 80 टक्के व्यवहार डॉलरमध्ये होतात. मात्र, इराणने आपल्या नियंत्रणातील होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करून चीनच्या युआन चलनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

अहवालानुसार, या मार्गातून जाणार्‍या काही व्यापारी जहाजांकडून युआनमध्ये शुल्क आकारले जात आहे. यामुळे ‘पेट्रोयुआन’ संकल्पना पुढे येत असून, चीन-इराण आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होत आहे. 2021 मधील 25 वर्षांच्या रणनीतिक भागीदारीनंतर दोन्ही देशांमधील व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

चीन हा इराणच्या तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार असून, 80 टक्क्यांहून अधिक निर्यात तोच घेतो. त्याबदल्यात इराण चीनकडून यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक साहित्य आयात करतो. तज्ज्ञांच्या मते, युआनचा वापर वाढत असला, तरी डॉलरला पूर्णपणे पर्याय बनणे सध्या कठीण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news