Iran Oil Tanker Attack | होर्मुझ सामुद्रधुनीत इराणचा तेलाच्या टँकरवर हल्ला

वाढत्या इंधन दरांमुळे ट्रम्प प्रशासनावरील दबाव वाढला
Iran Oil Tanker Attack |
वॉशिंग्टन : मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली.
Published on
Updated on

वॉशिंग्टन / तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकन सैन्याच्या हवाई सुरक्षेत होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तेल टँकरवर हल्ला करून त्यांना रोखल्याचा दावा इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने केला आहे. या कारवाईनंतर इतर चार टँकरनी त्वरित आपला मार्ग बदलून माघार घेतली.

अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांपूर्वी पुन्हा सुरू झालेल्या संघर्षामुळे हा मुख्य सागरी वाहतूक मार्ग ठप्प झाला आहे. अमेरिकेने जॉर्डनमधील आपल्या तळांवरील हल्ल्याचा बदला म्हणून इराणवर प्रत्युत्तरी कारवाई केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरेल ९० डॉलर्सच्‍या पार गेले आहेत. दरम्यान, कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या लष्करी व महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करणारे इराणी ड्रोन्स पाडल्याचे सांगितले. दुसरीकडे, लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्याने प्राचीन बीफोर्ट किल्ल्याजवळ हिजबुल्लाहच्या बोगद्यांना लक्ष्य करत मोठा स्फोट घडवून आणला.

अमेरिकेत मंत्रिमंडळाची आपत्कालीन बैठक

सामुद्रधुनीवरील मार्ग बळाचा वापर करून मोकळा करण्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न निष्फळ ठरताना दिसत आहेत. इंधनाचे वाढते दर आणि महागाईमुळे अमेरिकन नागरिकांमध्ये असंतोष आहे. या युद्धावर पुढील दिशा ठरवण्यासाठी ट्रम्प यांनी 'कॅम्प डेव्हिड' येथे मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित केली. अवघ्या काही आठवड्यांत संपेल असे आश्वासन दिलेले हे युद्ध आता पाचव्या महिन्यात पदार्पण करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news