Waterfall Accident: धबधब्यावर भीषण दुर्घटना! २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर

Indonesia Waterfall Accident: इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा प्रांतातील रोबो हराऊ धबधब्यावर पाय घसरून उंचावरून पडल्याने २५ वर्षीय विंडी रहमा पुत्री हिचा मृत्यू झाला.
Indonesia Waterfall Accident Video
Indonesia Waterfall Accident VideoPudhari
Published on: 
Updated on: 

Indonesia Waterfall Accident: इंडोनेशियातील एका धबधब्यावर फिरायला गेलेल्या २५ वर्षीय तरुणीचा पाय घसरून मृत्यू झाला आहे. विंडी रहमा पुत्री असे या तरुणीचे नाव असून, ती पश्चिम सुमात्रा प्रांतातील पडांग परिअमन येथील रहिवासी होती. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तो पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विंडी रहमा पुत्री इंडोनेशियातील पश्चिम सुमात्रा प्रांतातील लिमापुलुह कोटा जिल्ह्यात असलेल्या रोबो हराऊ धबधब्यावर गेली होती. धबधब्यात अंघोळ करत असताना तिचा पाय घसरला आणि ती उंचावरून खाली पडली. या घटनेनंतर तिचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाने मोहीम सुरू केली. मात्र, दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेहच हाती लागला.

Indonesia Waterfall Accident Video
Sanjay Raut Supreme Court Apology: ‘एकदा नाही, मी दहादा माफी मागतो’; संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी का मागितली?

शुक्रवारी सकाळी सापडला तरुणीचा मृतदेह

गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजून ४५ मिनिटांनी ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली. मात्र, बचाव पथकाला या घटनेची माहिती सायंकाळी सुमारे ५ वाजून २७ मिनिटांनी मिळाली. त्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

पदांग येथील शोध आणि बचाव कार्यालयाचे प्रमुख अब्दुल मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने धबधब्याच्या परिसरात शोध घेतला. शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी तरुणीचा मृतदेह सापडला. त्यानंतर पथकाने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाही केली.

Indonesia Waterfall Accident Video
Delhi-Mumbai Expressway Accident: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; बस दरीत कोसळली, आठ जणांचा जागीच मृत्यू

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तरुणी धबधब्याजवळ असताना घसरून खाली पडल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

काही युजर्सनी धबधब्याच्या परिसरातील उंच आणि निसरड्या जागांकडे लक्ष का दिले जात नाही. अशा ठिकाणी थोडीशी चूकही जीवावर बेतू शकते, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. तरुणीच्या मैत्रिणीला हा प्रसंग प्रत्यक्ष पाहावा लागला, याची कल्पनाही करवत नसल्याचे काही जणांनी म्हटले आहे. या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबीयांप्रती अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

धबधब्यांवर जाताना काळजी घेणे गरजेचे

धबधबे आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा अनेकांना छंद असतो. मात्र, अशा ठिकाणी पाण्याचा प्रवाह, निसरडे दगड आणि उंच कडे यांमुळे अपघात होण्याचा धोका असतो. विशेषतः धबधब्याखाली अंघोळ करताना किंवा फोटो आणि व्हिडीओ काढताना अधिक सावध राहणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news