सहा दशकांत भारताची लोकसंख्या तिपटीवर

सहा दशकांत भारताची लोकसंख्या तिपटीवर

न्यूयॉर्क/नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  भारताची लोकसंख्या 6 दशकांत तिपटीवर वाढली आहे. 1951 मध्ये आम्ही 36 कोटी होतो. आज 142 कोटी आहोत. आम्ही याकडे 142 कोटी संधी म्हणून बघतो, अशी प्रतिक्रिया यावर यूएनपीएफपीएतील भारतीय प्रतिनिधीने दिली आहे.

केरळ, पंजाबमध्ये ज्यष्ठांची संख्या अधिक, तर बिहार आणि उत्तर प्रदेशात युवकांची संख्या अधिक आहे.
आगामी तीन दशकांपर्यंत भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत राहील. 165 कोटींवर पोहोचल्यानंतर तीत घट सुरू होईल.

2021 मध्ये कुटुंबनियोजनाची सक्त न करण्यावरच भारताचा भर राहिला. चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांत वृद्ध लोकसंख्या अधिक आहे. 65 वर्षांवरील लोकांची संख्या भारतात फक्त 7 टक्के आहे, तर चीनमध्ये हे प्रमाण 14 टक्के, अमेरिकेत 18 टक्के आहे. चीन, अमेरिकेच्या तुलनेत भारताचा जन्मदर जास्त असला तरी गेल्या काही वर्षांत त्यातही घट झालेली आहेच. सर्वसामान्य भारतीय महिलेला 2 वर अपत्ये नको असतात. चीनमध्ये हेच प्रमाण महिलानिहाय 1.2, तर अमेरिकेत 1.6 आहे. भारतात बालमृत्यूदरात गेल्या 3 दशकांत 70 टक्के घट झाली आहे, हेही इथे महत्त्वाचे.

भारत 1.4 अब्ज लोकसंख्येचा देश होणे, याचा अर्थ आम्ही भारताकडे 1.4 अब्ज संधी उपलब्ध आहेत, असा घेतो. देशाची 25.4 कोटी लोकसंख्या 15 ते 24 वयोगटातील असणे, ही भारताच्या उत्पादक क्षमतेसाठी जमेची बाजू ठरेल.
– अँड्रिया वोझ्नार भारतीय प्रतिनिधी, यूएनएफपीए

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news