Thailand Transgender Attack: लाथा-चप्पलांनी मारहाण! थायलंडमध्ये पैशाच्या वादातून भारतीय पर्यटकावर ट्रान्सजेंडर महिलांचा जीवघेणा हल्ला

Thailand Transgender Attack: थायलंडमधील पटाया शहरात भारतीय पर्यटकावर ट्रान्सजेंडर महिलांच्या गटाने हल्ला केला. पैशांच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
Thailand Transgender Attack video viral
Thailand Transgender Attack video viralPudhari
Published on
Updated on

Thailand Indian Man Attacked in Pattaya After Payment Dispute:

थायलंडमधील पटाया शहरात एका भारतीय तरुणाला ट्रान्सजेंडर महिलांच्या समूहाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यात संबंधित भारतीय तरुणाला रस्त्यातच लाथा-बुक्क्या आणि चप्पलांनी मारहाण करताना दिसत आहे.

पटाया हे शहर जगभरात नाइटलाइफसाठी ओळखले जाते. येथे मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येतात, त्यात भारतीय पर्यटकांचाही मोठा वाटा आहे. मात्र, अलीकडील या घटनेमुळे पटायामधील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वाद नेमका कशामुळे झाला?

माध्यमांच्या माहितीनुसार, संबंधित भारतीय तरुण आणि ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर यांच्यात पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. ट्रान्सजेंडर महिलांचा आरोप आहे की त्या तरुणाने ‘सर्व्हिस’ घेतल्यानंतर पूर्ण पैसे देण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला आणि काही वेळातच हा वाद वाढला. पुढे इतर ट्रान्सजेंडर महिलाही यात सहभागी झाल्या आणि भारतीय तरुणाला रस्त्यातच मारहाण करण्यात आली.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, पटायाच्या प्रसिद्ध वॉकिंग स्ट्रीट परिसराच्या एंट्रन्सजवळ हा प्रकार घडला. आधी दोन व्यक्तींमध्ये भांडण सुरू होतं, पण काही वेळातच ते भांडण वाढलं. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले झाले, असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

तरुण जखमी, रुग्णालयात उपचार

या मारहाणीत भारतीय तरुणाच्या चेहऱ्यावर आणि डोक्याच्या मागील भागाला दुखापत झाली आहे. घटनास्थळी त्याला प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला पट्टामकुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या घटनेचा व्हिडिओ 3 जानेवारी 2026 रोजी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून, आतापर्यंत 90 लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. व्हिडिओवर प्रतिक्रिया देणारे लोक दोन गटांत विभागले गेले आहेत. काहीजण ट्रान्सजेंडर महिलांच्या भूमिकेचं समर्थन करत आहेत, तर अनेक भारतीय यूजर्सनी या मारहाणीचा तीव्र निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे परदेशात जाणाऱ्या भारतीय पर्यटकांनी स्थानिक कायदे, नियम आणि संवेदनशील भागांमध्ये अधिक सावधगिरी बाळगे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news