Oman Coast Ship Attack : ओमान किनारपट्टीवर भारतीय व्‍यापारी जहाजावर हल्ला; १३ खलाशांची सुटका

एका भारतीय नागरिकाचा शोध सुरू; परराष्ट्र मंत्रालयाकडून हल्ल्याचा तीव्र निषेध
Oman Coast Ship Attack
प्रतिकात्‍मक छायाचित्र.File Photo
Published on
Updated on

Indian crew rescued Oman ship attack : ओमानच्या किनारपट्टीजवळ 'एमटी अल गैया' (MT El Gaia) या व्यापारी जहाजावर रविवारी झालेल्या हल्ल्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या जहाजावर एकूण १४ भारतीय खलाशी तैनात होते. त्यापैकी १३ भारतीयांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, एका लापता भारतीय नागरिकाचा शोध सध्या सुरू आहे.

हल्ल्याचा भारताकडून निषेध

या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या एका भारतीय नागरिकाचा शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून ओमानच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे. व्यापारी जहाजे, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवरील हल्ले अस्वीकार्य असल्याचे नमूद करत, भारताने तणाव कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे तसेच संवाद व मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. तसेच, या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून मुक्त व सुरक्षित नौकानयन आणि व्यापाराची वाहतूक पूर्ववत करण्याचे आवाहनही भारताने केले.

Oman Coast Ship Attack
BRICS Summit 2026 : PM मोदींनी आयोजित केलेल्‍या 'ब्रिक्स' स्नेहभोजनाला चीनचे अध्‍यक्ष शी जिनपिंग यांची दांडी!

दूतावास ओमानच्या स्थानिक प्रशासनासोबत संपर्कात

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, ही घटना घडताच मस्कत येथील भारतीय दूतावासाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. दूतावास ओमानच्या स्थानिक प्रशासनासोबत सतत संपर्कात असून शोध आणि बचाव कार्यावर (Search and Rescue operation) बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Oman Coast Ship Attack
PM Modi BRICS Summit 2026 : जगात तणाव झपाट्याने वाढतोय, सामान्य माणसांवर गंभीर परिणाम; ब्रिक्स परिषदेत PM मोदींचे प्रतिपादन

भारताने मानले ओमान प्रशासनाचे आभार

भारतीय नागरिकांच्या सुटका मोहिमेत मोलाचे सहकार्य केल्याबद्दल भारताने ओमान प्रशासनाचे आभार मानले आहेत. बेपत्ता खलाशाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य अधिक वेगाने राबवले जात आहे.

Oman Coast Ship Attack
BRICS Pahalgam Attack Statement : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा 'ब्रिक्स'च्या संयुक्त जाहीरनाम्यात तीव्र निषेध

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news