India Aid to Nepal | भारताचा नेपाळला मदतीचा हात! भूकंपग्रस्त जिल्ह्यांमध्ये बांधणार 14 शाळा

कोट्यवधी रुपयांचा निधी
India Aid to Nepal |
India Aid to Nepal | भारताचा नेपाळला मदतीचा हात! भूकंपग्रस्त जिल्ह्यांमध्ये बांधणार 14 शाळा
Published on
Updated on

काठमांडू; वृत्तसंस्था : नेपाळमधील भूकंपग्रस्त आठ जिल्ह्यांमध्ये 14 शाळांच्या पुनर्बांधणीसाठी भारताने 56 कोटी 2 लाख नेपाळी रुपयांची (अंदाजे 35 कोटी भारतीय रुपये) आर्थिक मदत जाहीर केली आहे.

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या शेजारी राष्ट्राच्या आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी भारताने पुन्हा एकदा आपले कटिबद्धतेचे नाते अधोरेखित केले आहे. नेपाळच्या शिक्षण आणि क्रीडा मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल लेव्हल प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट-एज्युकेशनने या शाळांच्या बांधकामासाठी करारांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत. ही मोहीम भारत सरकारच्या 56 कोटी 2 लाख नेपाळी रुपयांच्या अनुदानांतर्गत राबवली जात असल्याची माहिती काठमांडूतील भारतीय दूतावासाने बुधवारी (27 मे) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

संबंध द़ृढ होण्यास मदत

भारताच्या या पुढाकारामुळे भूकंपग्रस्त भागातील हजारो नेपाळी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक द़ृढ होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news