Pakistan F-16 Aircraft | पाकच्या ‘एफ-१६’ विमानांच्या पॅकेजवर भारताचा तीव्र आक्षेप

राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यासमोर नोंदवला आक्षेप
Pakistan F-16 Aircraft |
Pakistan F-16 Aircraft | पाकच्या ‘एफ-१६’ विमानांच्या पॅकेजवर भारताचा तीव्र आक्षेप
Published on: 
Updated on: 

सेबू; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या हवाई दलाच्या ‘एफ-१६’ लढाऊ विमानांसाठी अमेरिकेकडून सुरू असलेल्या आधुनिकीकरण व देखभाल पॅकेजवर भारताची तीव्र चिंता आणि आक्षेप भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यासमोर नोंदवला.

फिलिपाईन्स येथील सेबू शहरात आयोजित आशियान संरक्षणमंत्र्यांची बैठक-प्लस परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांच्यात द्विपक्षीय चर्चा पार पडली. या बैठकीव्यतिरिक्त राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षणमंत्री शिंजिरो कोईझुमी आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्ल्स यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू ‘मुक्त, खुला आणि सुरक्षित इंडो-पॅसिफिक प्रदेश’ राखण्यावर होता.

अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी को-ऑपरेशन एजन्सीन अधिसूचित केलेल्या ६८६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या या पॅकेजमुळे पाकिस्तानच्या एफ-१६ ताफ्याचे कार्यक्षम आयुष्य २०४० पर्यंत वाढणार आहे. या तंत्रज्ञानामुळे हवेतील वैमानिकांना जमिनीवरील कमांडर्ससोबत रिअल-टाईम माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेअर करणे शक्य होणार आहे. भारताने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, पाकिस्तानचे चीनसोबत अत्यंत घनिष्ठ लष्करी संबंध पाहता अमेरिकेचे हे अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान तिसऱ्या देशाच्या हातात पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news