

Elon Musk Starlink in india
दिल्ली: अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांच्या स्टारलिंकला (Starlink) अखेर भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी मान्यता मिळाल्याचे वृत्त आहे. मोदी सरकारकडून एलन मस्क यांची उपग्रह इंटरनेट सेवा भारतात सुरू करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
भारतीय दूरसंचार विभागाकडून देखील 'Starlink' ला भारतात मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे भारताने इंटरनेट क्रांतीकडे आता आणखी एक पाऊल टाकले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश उद्योगपती एलन मस्कची कंपनी स्टारलिंकचा भारतात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अमेरिकन कंपनी स्टारलिंकला उपग्रह संप्रेषण सेवांसाठी आशय पत्र जारी केले आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने (डीओटी) स्टारलिंकला (Starlink) एक पत्र जारी केले आहे.
यापूर्वी, भारत सरकारने Eutelsat OneWeb आणि Jio Satellite Communications ला परवाने देखील जारी केले होते. पारंपारिक उपग्रह सेवांपेक्षा वेगळे, स्टारलिंक (Starlink) इंटरनेट सेवा देण्यासाठी पृथ्वीच्या सर्वात कमी कक्षेत (पृथ्वीपासून ५५० किमी वर) उपग्रहांचा वापर करते.
स्टारलिंक ही स्पेसएक्सने विकसित केलेली एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. स्पेसएक्स ही एक अमेरिकन एरोस्पेस कंपनी आणि अंतराळ वाहतूक कंपनी आहे जी २००२ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी स्थापन केली होती. स्टारलिंक (Starlink) ही उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा प्रदान करते. जी एलन मस्कच्या कंपनी स्पेसएक्सने (SpaceX) स्थापन केली आहे. जगभरात हाय-स्पीड, वेगवान ब्रॉडबँड इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी ते उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करते.