

India Pakistan Conflict
"भारताने पंजाबमधील जालंधरमधील आदमपूर येथून सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. यापैकी एक क्षेपणास्त्र आदमपूरजवळ पडले. उर्वरित पाच क्षेपणास्त्रे अमृतसरच्या आसपासच्या भागात पडली. भारत आता स्वतःच्या लोकांना, विशेषतः पंजाबमध्ये राहणाऱ्या शीख आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहे, असा हायास्पद दावा लष्कराचे प्रवक्ते जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी केला आहे.
भारतावर हल्ले सुरू केले आहेत, असे पाकिस्तानी लष्कराने आज (दि.१०) सकाळी जाहीर केले. त्याला ऑपरेशन 'बुनयान-उल-मारसूस' असे नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ आहे, खूप मजबूत रक्षण करणारी भिंत, असेही पाकिस्तान लष्कराने म्हटलं आहे.पाकिस्तानने भारताच्या उधमपूर शहरातील एअरबेस आणि पठाणकोटमधील एअरफील्डला लक्ष्य केले आहे. पंजाबमधील बियास येथे असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या साठवणूक स्थळावरही हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच उरी येथील भारतीय लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालय आणि पुरवठा डेपोवर हल्ला केल्याचा दावाही पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे.
पाकिस्तानने 'ऑपरेशन बुनयान उल मरसूस' सुरू केल्यानंतर आणि अनेक भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. अज पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड अथॉरिटी (एनसीए) ची बैठक बोलावली आहे.नॅशनल कमांड अथॉरिटी ही पाकिस्तानमधील सर्वोच्च संस्था आहे जी देशाच्या अण्वस्त्रांचे उत्पादन, नियंत्रण, सुरक्षा आणि वापर यावर देखरेख करते.एनसीएची स्थापना २००० मध्ये झाली. त्याचा उद्देश अण्वस्त्रांचा वापर काटेकोर आणि संघटित पद्धतीने केला जावा हे सुनिश्चित करणे हा होता.