एका 'काॅल'ची प्रतीक्षा..! सुनीता विल्‍यम्‍सबाबत NASAने दिली महत्त्वाची अपडेट

अंतराळ स्थानकावर बुधवारी रात्री ८.३० वाजता साधणार संवाद
Sunita Williams still in space due to technical glitch
तांत्रिक बिघाडामुळे अद्याप सुनीता विल्यम्स अवकाशातचFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अमेरिकन अंतराळवीर बुच विलमोर हे सध्या अवकाश स्थानकावर अडकले आहेत. ५ जून रोजी नासाचे बोईंग स्टारलाईनर अंतराळ स्थानकावर पोहचले. मात्र आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकारील हवामान बदल आणि यानाच्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा पृथ्वीवरील प्रवास लांबला आहे. दरम्यान नासाने याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

७ दिवसांची मोहिम १ महिन्यांहून अधिककाळ लांबली

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी ५ जूनला अवकाश स्थानकावर पोहचले. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाकडून बोईंग स्टारलाईनर अवकाश मोहिमेच्या माध्यमातून हे दोघेही अवकाशात पोहचले. अवघ्या ७ दिवसानंतर बोईंग स्टारलाईनर पृथ्वीवर परतणार होते. मात्र अंतराळयानातील तांत्रिक अडचणीमुळे ते १ महिना होऊनही अद्याप अंतराळातच अडकले आहेत. दरम्यान जगालाच सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याची प्रतीक्षा लागली आहे. या पार्श्वभूमीवर नासाने महत्त्वाची अपडेट दिली आहे.

उद्या रात्री 8.30 वाजता संवाद साधणार

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकावर सुरक्षित असून, बुधवारी (दि.१० जुलै) रात्री 8.30 वाजता पृथ्वीला संबोधित करणार आहेत. यावेळी त्या थेट स्पेस स्टेशनवरून या मोहिमेविषयी संवाद साधणार असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे. आता या काॅलकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news