IMF on Pakistan: ऑपरेशन सिंदूर"नंतर IMF चा पाकिस्तानला मोठा इशारा; आर्थिक हप्त्याच्या पुढील अटींसाठी 11 नवीन अटी

IMF on Pakistan: भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेला तणाव कायम राहिला तर पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमावर गंभीर परिणामाची शक्यता IMF ने वर्तवली आहे
shehbaz sharif and IMF
shehbaz sharif and IMFPudhari
Published on
Updated on

IMF on Pakistan:

इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानच्या आर्थिक मदत योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 11 नवीन अटी लावल्या असून भारताशी वाढलेल्या तणावामुळे या कार्यक्रमाच्या आर्थिक, बाह्य व सुधारणा उद्दिष्टांवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. Express Tribune या वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

IMF च्या स्टाफ लेव्हल रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेला तणाव जर कायम राहिला किंवा अधिक वाढला, तर पाकिस्तानच्या आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

IMF च्या नव्या 11 अटींचा आढावा

  • Rs 17.6 ट्रिलियनचा नवीन बजेट संसदेमधून मंजूर करणे.

  • वीज बिलांवरील कर्जफेड अधिभार (debt servicing surcharge) वाढवणे.

  • 3 वर्षांहून जुनी वापरलेली गाड्या आयात करण्यावरची बंदी हटवणे.

  • राज्यांकडून (प्रांतिक सरकार) कृषी उत्पन्न कराची अंमलबजावणी – करदात्यांची नोंदणी, रिटर्न प्रक्रिया, जनजागृती मोहीम, अनुपालन सुधार योजना तयार करणे. मुदत – जून 2025.

  • "Governance Diagnostic Assessment" वर आधारित एक कारवाई योजना जाहीर करणे.

  • 2027 नंतरच्या कालावधीसाठी आर्थिक धोरणांची रूपरेषा तयार करणे व प्रकाशित करणे.

shehbaz sharif and IMF
Javed Akhtar on Pakistan: नरक आणि पाकिस्तान असे दोनच पर्याय असतील तर मी नरकात जाईन; जावेद अख्तर यांचा घणाघात

ऊर्जा क्षेत्रातील 4 नवीन अटी

  • वार्षिक वीज दर पुनर्निधारण (tariff rebasing) जाहीर करणे – मुदत 1 जुलै 2025.

  • गॅस दरातील अर्धवार्षिक समायोजन जाहीर करणे – मुदत 15 फेब्रुवारी 2026.

  • Captive Power Levy Ordinance कायदा कायमस्वरूपी बनवणारा कायदा संसदेमधून मंजूर करणे – मुदत मे 2025 अखेर.

  • Rs 3.21 प्रति युनिटची वीज अधिभार मर्यादा (cap) काढून टाकणारा कायदा संसदेमधून मंजूर करणे – मुदत जून 2025.

शेवटची अट

Special Technology Zones व औद्योगिक पार्कसाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रोत्साहन योजना 2035 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्णपणे बंद करण्याची योजना तयार करणे – मुदत डिसेंबर 2025.

याशिवाय, ग्राहकांसाठी अनुकूल असलेल्या एका अटीत IMF ने सांगितले आहे की, पाच वर्षांखालील वापरलेल्या गाड्यांच्या व्यावसायिक आयातीवरील सर्व प्रमाणात्मक निर्बंध हटवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर प्रस्तावना जुलैअखेर संसदेत मांडावी. सध्या फक्त तीन वर्षांपर्यंतच्या वापरलेल्या कारच आयात करता येतात.

shehbaz sharif and IMF
Indian blogger spy Pakistan: महिला ट्रॅव्हल ब्लॉगरचे पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यासोबत अनैतिक संबंध? पाकसाठी केली हेरगिरी...

पार्श्वभूमी

भारताने 7 मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. त्यानंतर पाकिस्तानने 8, 9 आणि 10 मे रोजी भारतीय लष्करी तळांवर प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला.

10 मे रोजी ड्रोन व क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान दरम्यान संघर्ष थांबवण्याची तडजोड झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news