Houthi rebels attack Israel | येमेनमधून हुथी बंडखोरांचा इस्रायली लष्करी तळावर हल्ला

युद्धातील हुथीच्या एंट्रीमुळे चिंता वाढली
Houthi rebels attack Israel
तेल अवीव : इस्रायलमधील तेल अवीव येथे इराणने शनिवारी पहाटे जोरदार क्षेपणास्त्र हल्ले चढविले. त्यानंतर एका पडझड झालेल्या इमारतीतून बाहेर पडताना रहिवासी. (एपी/पीटीआय)
Published on
Updated on

तेल अवीव; वृत्तसंस्था : इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या लष्करी तळावर हल्ला केला. त्याची जबाबदारीही हुथीने स्वीकारली आहे. मध्यपूर्वेतील युद्ध सुरू झाल्यापासून बंडखोरांनी केलेला हा पहिलाच हल्ला आहे.

हुथींचे लष्करी प्रवक्ते, ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी शनिवारी सकाळी बंडखोरांच्या अल-मसिराह सॅटेलाइट टेलिव्हिजनवर प्रसारित केलेल्या एका निवेदनात हा दावा केला. तथापि, आम्ही हे क्षेपणास्त्र रोखल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. शुक्रवारी सारी यांनी एका अस्पष्ट निवेदनातून बंडखोर या युद्धात सामील होतील असे संकेत दिल्यानंतर काही तासांतच हा हल्ला झाला. या युद्धामुळे संपूर्ण प्रदेश हादरला आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थाही हादरली आहे. सारी म्हणाले की, त्यांनी दक्षिण इस्रायलमधील संवेदनशील इस्रायली लष्करी स्थळे म्हणून वर्णन केलेल्या ठिकाणांना लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला.

तांबड्या समुद्रातील जहाजे लक्ष्य होणार?

हुथींच्या युद्धप्रवेशामुळे, बंडखोर पुन्हा एकदा तांबड्या समुद्राच्या कॉरिडॉरमधून प्रवास करणार्‍या व्यापारी जहाजांना लक्ष्य करतील का, ज्यामुळे जागतिक सागरी वाहतुकीत आणखी व्यत्यय येईल, हा प्रश्नही निर्माण झाला आहे. नोव्हेंबर 2023 ते जानेवारी 2025 या कालावधीत हुथी बंडखोरांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे 100 हून अधिक व्यापारी जहाजांवर हल्ला केला होता. यात दोन जहाजे बुडाली आणि चार खलाशांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news