बायडेनपेक्षा हॅरिस यांना पसंती
वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकन नागरिक 2024 मध्ये त्यांचे 47 वे राष्ट्राध्यक्ष निवडणार आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा उत्सुक आहेत. विश्वासार्ह मानल्या जाणार्या मॉनमाऊथ युनिव्हर्सिटीच्या सर्वेक्षणाचा निकाल समोर आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मान्यता रेटिंगच्या बाबतीत, बायडेन उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या 1 टक्के मतांनी मागे आहेत. अप्रूव्ह रेटिंगमध्येही कमला 3 टक्के मतांनी पुढे राहिल्या आहे. तसेच बायडेन-कमला यांच्या डेमोक्रॅटिक पक्षासाठी ही अद्याप चांगली बातमी नाही, कारण रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या दोघांपेक्षा खूप पुढे आहेत. सर्वेक्षणानुसार, सध्या जुलै 2023 पासून व्हाईट हाऊसमध्ये असलेल्या बायडेन यांच्यासाठी सध्याचा काळ चांगला नाही. केवळ 34 अमेरिकन 81 वर्षीय बायडेन यांना आणखी एक टर्म देऊ इच्छित आहेत. 61 टक्के अमेरिकन आता बायडेन यांना आणखी एक संधी देऊ इच्छित नाहीत. कमला हॅरिस 35 टक्के मतांसह मान्यता रेटिंगच्या बाबतीत बायडेन यांच्यापेक्षा 1 टक्क्यांनी पुढे आहेत. 'द हिल'च्या अहवालानुासरहे 1 टक्के खूप महत्त्वाचे आहे कारण कमला मागून पुढे आल्या आहेत कमलांचे डिसअप्रूव्हल रेटिंग 57 टक्के आहे आणि ते बायडेन यांच्यापेक्षा 4 टक्के कमी आहे, पण हॅरिस यांना बायडेन यांच्यापेक्षा चांगला कमांडर इन चीफ मानत आहेत.
काही अमेरिकन डेमोक्रॅटिक अथवा रिपब्लिकन पसंती देत नाहीत. या अर्थाने, बायडेन लोकप्रियता कमी होत आहेत. जुलैमध्ये 24 टक्के नागरिकांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. आता केवळ 14 टक्के अमेरिकन नागरिकांनी बायडेन यांनी पसंती दिली आगे. 69 टक्के अमेरिकन बायडेन यांना स्थलास्तर मुद्द्यावर आणि 68 टक्के महागाईवरून अपयशी मानतात.

