Hafiz Talha Saeed : हाफिज सईदच्या मुलाला चीनची पाठराखण, ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा प्रस्ताव रोखला  

हाफिज सईदच्या मुलाला चीनची पाठराखण, ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा प्रस्ताव रोखला  
Hafiz Talha Saeed : हाफिज सईदच्या मुलाला चीनची पाठराखण, ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा प्रस्ताव रोखला
Hafiz Talha Saeed : हाफिज सईदच्या मुलाला चीनची पाठराखण, ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा प्रस्ताव रोखला मोस्ट वाॅन्टेड हाफिज सईदच्या
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघात (UN) पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचा बचाव केला आहे. बुधवारी (दि.२०) लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा पाकिस्तानस्थित दहशतवादी हाफिज तलह सईद (Hafiz Talha Saeed ) याला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकण्याचा भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव चीनने संयुक्त राष्ट्रात रोखून धरला आहे. दोन दिवसांत चीनने दुसऱ्यांदा दहशतवाद्यांच्या बचावाची भूमिका घेतली आहे.

हाफिज तल्हा सईद (४६) हा एलईटी या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नेता असून तो २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा आहे. एप्रिल2022 मध्ये त्याला भारत सरकारने दहशतवादी घोषित केले होते. माहितीनुसार, हाफिज तलह सईद याला ब्लॅकलिस्ट करण्याच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 1267 अल कायदा प्रतिबंध समितीचा अंतर्गत प्रस्ताव चीनने रोखून धरला.

Hafiz Talha Saeed : पाकिस्‍तानमधील दहशतवादाला चीनचे समर्थन

चीनकडून सातत्‍याने पाकिस्‍तानमधील दहशतवाद्‍यांची पाठराखण केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्‍तानमधील लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या शाहिद महमूद याला आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित करावे, असा प्रस्‍ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये सादर केला होता. मात्र चीनने या प्रस्‍तावला विरोध केला आहे. चीनने अशा प्रकार दहशतवाद्यांना ब्‍लॅकलिस्‍टमध्‍ये टाकण्‍यास सलग चारवेळा नकार दिला आहे.

अमेरिकेने डिसेंबर २०१६ मध्‍ये पाकिस्‍तानमधील लश्‍कर-ए-तोयबाचा म्‍होरक्‍या शाहिद महमूद याला आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित केले होते. मात्र चीनने नेहमीच याला विरोध केला आहे. आता भारत आणि अमेरिकेने संयुक्‍त प्रस्‍ताव सादर केला होता. मात्र चीनने संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या सुरक्षा परिषदेत याला विरोध केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news