‘हिंदूफोबिया’ विरोधात विधेयक सादर करणारे पहिले अमेरिकन राज्य ठरले जॉर्जिया

Bill Against Hinduphobia: हिंदूविरोधी भेदभाव कायद्याच्या चौकटीत आणण्यावर राजकीय एकमत
Bill Against Hinduphobia in Georgia
Bill Against Hinduphobia in Georgiapudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: जॉर्जिया राज्य हिंदूफोबिया विरोधात विधेयक सादर करणारे पहिले अमेरिकन राज्य ठरले आहे. SB 375 या ऐतिहासिक विधेयकाच्या माध्यमातून हिंदूविरोधी भेदभावाला कायद्याच्या चौकटीत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या विधेयकाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांच्या सिनेटर्सचा पाठिंबा लाभला आहे. हिंदू धर्मीयांवरील पूर्वग्रह, द्वेष आणि अन्यायाला रोखण्यासाठी जॉर्जिया राज्याने उचललेले हे पाऊल अमेरिकेतील हिंदू समुदायासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

सध्या अमेरिकेतील हिंदू लोकसंख्या सुमारे २५ लाख (०.९%) आहे. दरम्यान, कॅलिफोर्नियात मांडण्यात आलेल्या SB 509 विधेयकाला हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

SB 375 विधेयक नेमकं काय आहे?

SB 375 हे विधेयक जॉर्जियाच्या दंड संहितेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून हिंदूफोबिया ही संज्ञा कायदेशीरपणे मान्य होईल आणि कायदा अंमलबजावणी संस्था त्यानुसार कारवाई करू शकतील.

Legiscan.com नुसार, हे विधेयक जॉर्जिया राज्य सरकारच्या अधिकृत कोडमधील Chapter 1 of Title 50 मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. हे विधेयक असे सुचवते की, ज्या कायद्यांद्वारे वंश, रंग, धर्म, किंवा राष्ट्रीय उत्पत्तीच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई केली जाते, त्या कायद्यांत हिंदूफोबियाची व्याख्या अंतर्भूत केली जावी.

या विधेयकात काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपीने कोणत्याही व्यक्ती/समूहाला जाणीवपूर्वक लक्ष्य केले होते का, हे ठरवताना हिंदूफोबियाचा विचार करण्याची मुभा न्यायप्रणालीला द्यावी, अशी तरतूद आहे. या विधेयकात व्याख्या, मर्यादा, अंमलबजावणीची तारीख, इतर संबंधित बाबी आणि परस्परविरोधी कायदे रद्द करण्याचा उल्लेख आहे.

विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे:

  • भेदभावाच्या केसेसमध्ये हिंदूफोबिया विचारात घेता येणार

  • कायद्यात ‘हिंदूविरोधी द्वेष’ स्पष्टपणे नमूद होणार

  • दोषीवर कठोर कारवाईसाठी कायद्यात सुधारणा

रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक दोन्ही पक्षांचा पाठिंबा

या विधेयकाला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक पक्षांच्या सिनेटर्सनी पाठिंबा दिला आहे. हे अमेरिकन राजकारणात धार्मिक सहिष्णुतेच्या दृष्टिकोनातून दुर्मिळ उदाहरण ठरले आहे.

Coalition of Hindus in North America (CoHNA) या संघटनेने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की रिपब्लिकन सिनेटर शॉन स्टिल आणि क्लिंट डिक्सन, तसेच डेमोक्रॅटिक सिनेटर जेसन एस्टेव्हस आणि इमॅन्युएल डी जोन्स यांनी एकत्रितपणे SB 375 या विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “हे विधेयक राज्याच्या दंड संहितेत सुधारणा करून हिंदूफोबिया आणि हिंदुविरोधी पूर्वग्रह यांना अधिकृत मान्यता देते आणि कायदा अंमलबजावणी संस्था व इतर एजन्सींना अशा भेदभावाचे दस्तऐवजीकरण करताना व कारवाई करताना हिंदूफोबियाचा विचार करण्यास सक्षम करते.”

हिंदूंची लोकसंख्या आणि सामाजिक भूमिका

Pew Research Center च्या अहवालानुसार, सध्या अमेरिकेत सुमारे 0.9 % म्हणजेच सुमारे 25 लाख हिंदू आहेत. उद्योग, शिक्षण, तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात हिंदू अमेरिकन समाजाचे योगदान लक्षणीय आहे.

SB 375 हे फक्त एक विधेयक नाही, तर अमेरिकेत हिंदू समुदायासाठी एक मूक पण प्रभावी क्रांतीची सुरुवात मानली जात आहे. धार्मिक सहिष्णुता आणि समानतेसाठी जॉर्जियाचे हे पाऊल इतर राज्यांसाठीही प्रेरणादायक ठरू शकते.

कॅलिफोर्नियामध्ये SB 509 विधेयकाला हिंदू संघटनांचा विरोध

दुसरीकडे, कॅलिफोर्नियात SB 509 हे विधेयक मांडण्यात आले आहे ज्यामध्ये ‘transnational repression’ संदर्भात कायद्यासाठी पावले उचलली जात आहेत. मात्र, या विधेयकातील अस्पष्ट भाषा ही हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी वापरली जाऊ शकते, असा हिंदू संघटनांचा आरोप आहे.

CoHNA आणि इतर हिंदू-अमेरिकन संघटना या विधेयकाला विरोध करत आहेत. हे विधेयक सिनेटर अॅना कॅबॅलेरो यांनी मांडले आहे.

Bill Against Hinduphobia in Georgia
मार्क झुकेरबर्ग देशभक्त की गद्दार? चीनशी गुप्त भागीदारीचा 'Meta'च्या माजी अधिकार्‍याचा गौप्यस्फोट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news