FBI च्या टॉप १० मोस्ट वॉन्टेड यादीत गँगस्टर गोल्डी ब्रार; १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर

Gangster Goldy Brar On FBI's 10 Most Wanted List | FBI च्या टॉप १० मोस्ट वॉन्टेड यादीत गँगस्टर गोल्डी ब्रार; माहिती देणाऱ्यास १० लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर
Gangster Goldy Brar On FBI's 10 Most Wanted List
Gangster Goldy Brar On FBI's 10 Most Wanted List file photo
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने (FBI) कुख्यात गँगस्टर सतिंदरजित सिंग उर्फ गोल्डी ब्रारचा समावेश आपल्या टॉप-१० 'मोस्ट वॉन्टेड' गुन्हेगारांच्या यादीत केला आहे. त्याच्या अटकेसाठी उपयुक्त माहिती देणाऱ्यास १० लाख डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर केले आहे.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) सोमवारी जारी केलेल्या सूचनेप्रमाणे गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई ऑर्गनाईज्ड क्राईम ग्रुपचा उत्तर अमेरिकेतील लीडर म्हणून वॉन्टेड आहे. या ग्रुपचा संबंध अमेरिका आणि कॅनडामधील अनेक हिंसक गुन्ह्यांशी जोडला गेला असून गोल्डी ब्रारच्या अटकेस मदत करणाऱ्या, माहिती देणाऱ्यासाठी एफबीआयने तब्बल १० लाख यूएस डॉलर्स (सुमारे ८.३ कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले.

Gangster Goldy Brar On FBI's 10 Most Wanted List
Bill Gates AI Warning : एआय 1 अब्ज लोकांचा जीव घेईल! बिल गेटस्‌ यांच्या गंभीर इशार्‍याने खळबळ

लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध

अमेरिका आणि कॅनडामध्ये हिंसाचार पसरवणाऱ्या 'लॉरेन्स बिश्नोई संघटित गुन्हेगारी टोळी'शी गोल्डी ब्रारचा थेट सहभाग असल्याचा एफबीआयने आरोप केला आहे.

अत्यंत धोकादायक गुन्हेगार

एफबीआयने इशारा दिला आहे की, गोल्डी ब्रार हा सशस्त्र, अत्यंत धोकादायक आणि पळून जाण्यात सराईत आहे. त्याचा दक्षिण कॅलिफोर्निया आणि अमेरिका, कॅनडामध्ये विविध हिंसक कारवायांमध्ये कथितरित्या सहभाग आहे.

Gangster Goldy Brar On FBI's 10 Most Wanted List
Global Terrorism Index 2026 | जागतिक दहशतवाद निर्देशांकात पाकिस्तान ‘जगात टॉप’वर

एफबीआयने म्हटले आहे की, ही गुन्हेगारी टोळी "राजकीय आणि धार्मिक व्यक्तींच्या हत्या, गोळीबार, अपहरण करणे, खंडणी मागणे, हल्ले करणे तसेच अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करी करणे यांसारख्या हिंसक कारवायांमध्ये सक्रियपणे सामील आहे. लॉस एंजेलिसमधील यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाने गोल्डी ब्रारसाठी फेडरल अटक वॉरंट जारी केल्याचे देखील म्हटले गेले आहे.

गोल्डी ब्रार सध्या अमेरिकेत असून तो उत्तर अमेरिकेतील टोळीच्या कारवायांवर देखरेख करत असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ब्रारवर खंडणी मागणे, व्यापारात अडथळा आणणे, अमली पदार्थाची तस्करी वितरणाच्या उद्देशाने कट रचणे असे अनेक गंभीर आरोप आहेत.

या प्रकरणी एफबीआय, कॅनेडाचे पोलीस आणि लॉस एंजेलिस पोलिस सातत्याने छापे टाकत आहे. तसेच जनतेला आवाहन केले आहे की, जर त्यांच्याकडे गोल्डी ब्रारबद्दल कोणतीही माहिती असेल, तर त्यांनी तत्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख अत्यंत गोपनीय ठेवली जाईल. इतकेच नाही, तर त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्यास जवळपास ९ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news