धक्‍कादायक : चीनमध्ये चार अमेरिकन शिक्षकांवर चाकू हल्ला

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ईशान्‍य चीनमधील जिलिन प्रांतात एक धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. आयोवा येथील एका विद्यापीठातील चार अमेरिकन शिक्षकांवर चाकूने हल्ला करण्‍यात आल्‍याचे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.

अमेरिकेतील कॉर्नेल कॉलेजचे प्राध्यापक चीन दौर्‍यावर आहेत. ते आयोवा येथील विद्यापीठाला भेट देत असताना त्‍यांच्‍यावर चाकू हल्‍ला झाला. आयोवाचे खासदार रमारियानेट मिलर-मीक्स यांनी ट्विटरवर लिहिले, "आम्ही या प्रकरणाची दखल घेतली आहे. चाकू हल्‍ल्‍यातील जखमींवर उपचार केले जात आहे. यानंतरच या घटनेबाबत माहिती दिली जाईल."

आयोवाचे गव्हर्नर किम रेनॉल्ड्स यांनी ट्विटरवर लिहिले की, या भयानक हल्ल्याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या संपर्कात आहेत. महाविद्यालयाच्या प्रवक्त्या जेन विसर यांनी 'सीएनएन'शी बाेलताना सांगितले की, चाकू हल्‍ल्‍याची. घटना जिलिन शहरात घडली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news