Food Delivery boy : निगेटिव्‍ह रिव्ह्युमुळे डिलिव्हरी बॉयची महिलेला धमकी; ‘जेवणात विष कालवेन आणि…

 Delivery boy
Delivery boy
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फूड डिलिव्हरी बॉयच्या सेवेबद्दल वाईट रिव्ह्यू देणे महिलेला चांगलेच महागात पडले. वाईट रिव्ह्यू का दिला, अशी विचारणा करत डिलिव्हरी बॉयने चक्‍क महिलेचा पाठलाग केला. तिच्या घराबाहेर काठी घेवून उभा राहत तिला विष पाजण्याची धमकीही त्‍याने दिली. प्रकरण आहे चीनमधील फुजियान प्रांतातील. याची माहिती पीडित महिलेचा मित्र ली याने सोशल मीडियावर दिली आहे. त्याने एक व्हिडिओही शेअर केला  असून यामध्ये डिलिव्हरी बॉय महिलेच्या घराबाहेर ओरडताना दिसत आहे. (Food Delivery boy)

Food Delivery boy : तुझ्या मृत्यूची वाट पाहा…

'साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉयने जेवण वेळेवर आणले नाही. जेवण आल्यावर त्याने आम्हाला न कळवता दारातच जेवण ठेवले. डिलिव्हरी बॉयच्या कृत्याबाबत महिलेने डिलिव्हरी कंपनीकडे तक्रार केली आहे. त्यानंतर मॅनेजरने त्याला माफी मागायला पाठवले. या घटनेबद्दल मॅनेजरने स्वतः माफीही मागितली आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्याच्या वतीने माफीनामा पत्र पाठवले.फूड डिलिव्हरी बॉयच्या सेवेबद्दल एका महिलेने आपले मत सांगितले. त्‍याची सेवा निष्‍कृष्‍ट असल्‍याचा रिव्ह्यू तिने नाेंदवला. यामुळे डिलिव्हरी बॉय बिथरला. त्‍याने थेट महिलेला धमकी दिली. "पुढच्या वेळी जेवणाची ऑर्डर द्याल तेव्हा त्यात उंदराचे विष टाकेन. फक्त तुझ्या मृत्यूची वाट पाहा."

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया…

या घटनेची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोक डिलिव्हरी बॉयवर टीका करत आहेत. त्याचवेळी काही जणांनी महिलेबद्दल वाईट बोलण्यास सुरुवात केली. महिला आपल्या कामाचा आदर करत नसल्याचे त्यांनी सांगितले. एका वापरकर्त्याने सांगितले की, नकारात्मक रिव्ह्यू देण्यापूर्वी डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होईल याचा ग्राहक विचार करतात का? अशा प्रकारची ही पहिलीच बातमी नाही. खरं तर, चीनमध्ये यापूर्वीही अशीच प्रकरणे समोर आली आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news