Floating world Record | गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी 1942 लोक पाण्यावर तरंगले, अर्जेंटिनातील घटनेने वेधले लक्ष!

मार्क चिकीता या खाऱ्या पाण्याच्या तलावात केला रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रयत्‍न
Floating world Record
अर्जेंटिनातील मार चिकीता तलावात एकाचवेळी 1942 लोक तरंगले
Published on
Updated on

अर्जेंटिना मधील मार चिकीता (Mar Chiquita) या प्रसिद्ध तलावाच्या किनाऱ्यावर नुकताच एक अनोख्या कारणासाठी लोक जमले होते. 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंदवण्यासाठी आणि 'एकाच वेळी सर्वाधिक लोकांनी पाण्यात तरंगण्याचा विक्रम मोडण्यासाठी शेकडो लोक या खारट पाण्याच्या तलावात उतरले होते. कोणत्‍याही आधाराशिवाय तरंगणे ही याची अट होती. हा उपक्रम 'फेस्टिवल डी ला प्लांचिता' (Festival de la Planchita) या वार्षिक महोत्सवाचा भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा उपक्रम अर्जेंटिनातील मिरामार शहरात असलेल्या 'मार चिकीता' या अतिशय खारट तलावात पार पडला. या तलावाचे पाणी अतीक्षारयुक्त असल्याने यामध्ये माणूस सहजासहजी बूडत नाही. २०१७ मध्ये अर्जेंटिनातीलच 'लेक एपेक्युएन' (Lake Epecuén) येथे 1941लोकांनी एकत्र तरंगून जो विक्रम प्रस्थापित केला होता, तो मोडीत काढण्याचा प्रयत्‍न या लोकांनी केला. एकाचवेळी 1942 लोक या तलावात उतरले

या तलावात लोक बुडूच शकत नाहीत

मार चिकीता तलावातील पाण्याचे क्षारयुक्त प्रमाण समुद्राच्या पाण्यापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे. यामुळे या पाण्यात कोणताही आधार न घेता व्यक्ती सहजपणे तरंगू शकते. या नैसर्गिक वैशिष्ट्याचा फायदा घेत सहभागींनी एक मानवी साखळी तयार केली. या तलावात मिठाचे प्रमाण इतके जास्त आहे की मानवी शरीर नैसर्गिकरित्या वर ढकलले जाते.

पूर्वीचा विश्वविक्रम काय

यापूर्वी 29 जानेवारी 2017 रोजी 'लेक एपेक्युएन' मध्ये 1941लोकांनी 30 सेकंदांपर्यंत एकमेकांचे हात धरून तरंगण्याचा विक्रम केला होता. ताजा प्रयत्न हा आकडा पार करण्यासाठी करण्यात आला असून, हा रेकॉर्ड झाला आहे का याची पडताळणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या तज्ज्ञांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news