Ethiopia Volcano : 12 हजार वर्षांमध्‍ये प्रथमच असं घडलं..! इथिओपियात 'बॉम्बस्‍फोटा'सारखा ज्वालामुखीचा उद्रेक

शेवटच्‍या हिमयुगानंतर 'होलोसीन' युगात हायली गुब्बीच्या उद्रेकाची कोणतीही नोंद नाही
ethiopia volcano news
ethiopia volcano newsPudhari
Published on
Updated on

Ethiopia Volcano News

इथिओपियाच्या ईशान्येकडील प्रदेशात सुमारे १२,००० वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. या उद्रेकामुळे सुमारे नऊ मैलांपर्यंत (सुमारे १४.५ किलोमीटर) धुराचे दाट लोट आकाशात पसरले, अशी माहिती टूलूस ज्वालामुखी राख सल्लागार केंद्राने (VAAC) दिली आहे. दरम्‍यान, १००-१२० किमी/तास वेगाने वारे वाहत होते आणि राख भारतासह अनेक देशांमध्ये पसरली.

हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक

इरिट्रियन सीमेजवळ आदिस अबाबाच्या ईशान्येस सुमारे ५०० मैल अंतरावर इथिओपियाच्या अफार प्रदेशात स्थित हेली गुब्बी ज्वालामुखीचा रविवारी काही तासांपर्यंत उद्रेक झाला. सुमारे १,५०० फूट उंच असलेला हा ज्वालामुखी 'रिफ्ट व्हॅली' मध्ये आहे. हा प्रदेश दोन भूपट्टांच्या भेटीमुळे तीव्र भूगर्भीय हालचालींसाठी ओळखला जातो. येथशे दोन टेक्टोनिक प्लेट्स (भूपट्ट) एकत्र येतात.ज्वालामुखीतील राखेचे ढग येमेन, ओमान, भारत आणि उत्तर पाकिस्तानवर वाहून गेले, असे 'व्हीएएसी'ने म्हटले आहे, ज्याने राखेच्या ढगाच्या मार्गाचा नकाशा पोस्ट केला आहे.

ethiopia volcano news
Ethiopia volcano ash Delhi: इथियोपियामधील ज्वालामुखी स्फोटाची राख दिल्लीपर्यंत कशी पोहचली? जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

'होलोसीन' उद्रेकाचा कोणताही रेकॉर्ड नाही

मिशिगन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे ज्वालामुखीशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक सायमन कार्न यांनी स्‍पष्‍ट केले की, सुमारे १२,००० वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपले. यानंतर सुरू झालेल्या होलोसीन युगात ( होलोसीन (Holocene) हा भूवैज्ञानिक इतिहासातील सर्वांत अलीकडचा आणि सध्या चालू असलेला काळ आहे.) हायली गुब्बीच्या ( इथिओपियातील अफार प्रदेशात स्थित एक ज्वालामुखी उद्रेकाची कोणतीही नोंद नाही. दरम्‍यान, ज्‍वालामुखीच्‍या उद्रेकानंतर राखेचे ढग "उष्णकटिबंधीय जेट स्ट्रीममध्ये, अरबी समुद्रावरून वायव्य भारत आणि पाकिस्तानकडे वेगाने पूर्वेकडे पसरत आहेत."सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये, ज्याची पडताळणी एएफपी त्वरित करू शकले नाही, त्यात पांढऱ्या धुराचा जाड स्तंभ उठताना दिसत आहे.

ethiopia volcano news
Russian volcano eruption : रशियाच्या ज्वालामुखीचा 1,600 किलोमीटर लांब धूर

इथिओपियाच्‍या पशुपालनावर होणार आर्थिक परिणाम

इथिओपियामधील स्थानिक प्रशासक मोहम्मद सैद यांनी सांगितले की, या नैसर्गिक उद्रेकामध्‍ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या उद्रेकामुळे स्थानिक पशुपालकांच्या समुदायावर आर्थिक परिणाम होऊ शकतात. सैद यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची पूर्वी कोणतीही नोंद नव्हती आणि त्यांना रहिवाशांच्या उपजीविकेची भीती आहे आतापर्यंत कोणतेही मानवी जीवितहानी आणि पशुधन नष्ट झालेले नसले तरी, अनेक गावे राखेने माखली आहेत आणि परिणामी त्यांच्या प्राण्यांना चारा राहिलेलाच नाही." स्थानिक रहिवासी अहमद अब्देला यांनी एपीला सांगितले की, त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला आणि त्याला त्यांनी शॉक वेव्ह (धक्के) असे वर्णन केले. ते म्हणाले, "धूर आणि राखेसह अचानक बॉम्ब टाकल्यासारखे वाटले."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news