Elon Musk Flying car : इलॉन मस्क यांनी प्रत्‍यक्षात आणली हवेत उडणारी कार! ‘टेस्ला रोडस्टर २’ चे अनावरण; काय आहेत वैशिष्ट्ये!

उडू शकणाऱ्या कार्स आता केवळ स्वप्न नसून प्रत्यक्षात आल्या आहेत - इलॉन मस्क, स्पेस एक्स च्या रॉकेट टेक्नॉलॉजीवर आधारित कार
Elon Musk Flying car Tesla Roadster 2
Elon Musk Flying car Tesla Roadster 2
Published on: 
Updated on: 

Elon Musk Flying car Tesla Roadster 2 अमेरिकेतील टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी १५ ऑक्टोबर रोजी टेक्सास येथील स्पेसएक्सच्या चाचणी केंद्रात हवेत उडणाऱ्या कारचे प्रात्यक्षिक सादर केले. मस्क यांनी हवेत उडणारी 'Tesla Roadster 2' जगासमोर आणली. "उडू शकणाऱ्या कार्स आता केवळ स्वप्न नसून प्रत्यक्षात आल्या आहेत," असा दावा करत त्यांनी ऑटोमोबाईल जगताला एक नवी दिशा दिली आहे. ही कार सध्या प्रोटोटाइप स्वरूपात असून, तिचे प्रत्‍यक्षात उत्‍पादन २०२८ मध्ये सुरु होईल असा दावा काही तज्ञांनी केला आहे. आपल्या X हँडलवरुन मस्क यांनी या कारच्या प्रात्‍यक्षिकाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे Tesla Roadster 2 चे वैशिष्ट्ये

मस्क यांनी त्‍याच्या टेस्ला कारच्या रोडस्टर या मॉडेलला SpaceX रॉकेट थ्रस्टर्स जोडले आहेत, स्पेसएक्सच्या तंत्रज्ञानावर आधारित 'कोल्ड गॅस थ्रस्टर्स' बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे कारला हवेत झेपावणे आणि थोडा वेळ हवेत तरंगणे शक्य होते. ही कार अवघ्या एका सेकंदापेक्षा कमी वेळेत ० ते ९६ किमी/तास एवढा प्रचंड वेग पकडू शकते ही पूर्णपणे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार असून हवेत नियंत्रण राखण्यासाठी थ्रस्टर्सची जोड देण्यात आली आहे. हवेत उड्डाण करताना आणि जमिनीवर अतिवेगात धावताना स्थिर संतुलन राहण्यासाठी प्रगत एरोडायनॅमिक्सचा वापर करण्यात आला आहे. लँडिंग, टेकऑफ आणि सुरक्षित उड्डाणासाठी अत्याधुनिक ऑटोनॉमस सिस्टिम आणि सेन्सर्स देण्यात आले आहेत.

वाहतूक कोंडीसह आपत्‍कालिन सेवांसाठी खूप उपयुक्त

भविष्यात मोठ्या महानगरांमधील गंभीर ट्रॅफिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी एक पर्याय उपलब्ध होईल. वाहतूक कोंडीवर भविष्यात हा पर्याय असेल असे जाणकार म्हणत आहेत.

पूर, भूकंप किंवा वाहतूक कोंडीच्या वेळी वैद्यकीय मदत किंवा आवश्यक साहित्य जलद पोहोचवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

दोन शहरांमधील मध्यम अंतराचा प्रवास विमानतळावर न जाता थेट रस्त्यावरून हवेत झेपावून अत्यंत कमी वेळेत पूर्ण करता येईल.

काय असतील कार प्रत्‍यक्षात येण्यापुढील आव्हाने

कारने हवेत उड्डाण करण्यासाठी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाची (FAA व जागतिक नियामक) कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणि स्वतंत्र हवाई वाहतूक नियमावली आवश्यक असेल. रॉकेट थ्रस्टर्सचा आवाज आणि शहरांमध्ये उड्डाण करताना सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणे हे मोठे आव्हान असेल. सुरुवातीला ही कार सर्वसामान्यांच्या बजेटबाहेर असणार असून केवळ अतिश्रीमंत ग्राहकांसाठी मर्यादित राहील. मात्र, बॅटरी आणि थ्रस्टर तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर भविष्यात हे तंत्रज्ञान अधिक परवडणारे होऊ शकते.

एलॉन मस्क यांच्या या घोषणेने सायन्स फिक्शन चित्रपटांमधील 'फ्लाइंग कार'ची संकल्पना खऱ्या अर्थाने वास्तवात आणण्याच्या दिशेने पहिले मोठे पाऊल टाकले आहे. जगभरातील सोशल मिडीया, माध्यमे यांच्यावर मस्क यांच्या या कारची दखल घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news