

Elon Musk Net Worth Record :
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. या वाढीसोबतच मस्क यांनी श्रीमंतीचा एक मोठा विक्रम केला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनियर्स इंडेक्सच्या यादीनुसार टेस्ला स्पेसेक्सचे सीईओ मस्क हे ५०० बिलियन युएस डॉलर नेटवर्थ कमवणारे पहिले व्यक्ती झाले आहेत. त्यांच्या कंपन्यांचे शेअर वधारले आणि त्यानंतर त्यांच्या संपत्तीचे मुल्य वाढले. बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हा विक्रम केला आहे.
ऍलन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या (Tesla) शेअर्समध्ये अलीकडे झालेल्या जबरदस्त वाढीमुळे त्यांची एकूण संपत्ती वेगाने वाढली आहे. टेस्लासोबतच त्यांच्या स्पेसएक्स (SpaceX) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) फर्म एक्सएआय (xAI) या इतर कंपन्यांचे वाढते मूल्यांकनही या संपत्ती वाढीसाठी महत्त्वाचे ठरले आहे.
फोर्ज्सच्या माहितीनुसार, बुधवारी टेस्लाचे शेअर्स सुमारे ४% नी वाढून बंद झाले, ज्यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती विक्रमी ५००.१ अब्ज डॉलरवर (500.1 Billion USD) पोहोचली. या प्रचंड तेजीमुळे त्यांनी एकाच दिवसात ७ अब्ज डॉलरहून अधिक कमाई करण्याचा विक्रम केला. यासह, ५०० अब्ज डॉलर इतकी संपत्ती गाठणारे ते इतिहासातील पहिले व्यक्ती बनले आहेत.
मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतःच्या कंपनीचे सुमारे १ अब्ज डॉलरचे शेअर्स विकत घेतले होते, त्यांच्या या कृतीचाही गुंतवणूकदारांवर सकारात्मक परिणाम झाला आणि शेअर्सच्या वेगात आणखी भर पडली, ज्यामुळे मस्क यांच्या नावावर हा मोठा विक्रम नोंदवला गेला.
टेस्ला ही ऍलन मस्क यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा स्रोत राहिली आहे. या इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये या वर्षात आतापर्यंत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि मस्क यांच्याकडे टेस्लाचे १२.४% पेक्षा जास्त शेअर्स आहेत. दुसरीकडे, या वर्षात एकूण संपत्ती वाढवण्याच्या (Net worth growth) बाबतीत ओरेकलचे सीईओ लॅरी एलिसन हे मस्क यांच्यापेक्षा पुढे राहिले आहेत.
एलिसन यांनी २०२५ मध्ये आतापर्यंत १५७ अब्ज डॉलरची कमाई केली असून, सध्या ते मस्क यांच्या पाठोपाठ जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तरीही, मस्क यांच्या एकूण संपत्तीत या वर्षात सुमारे ३८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे, जी त्यांचे तंत्रज्ञान क्षेत्रातील आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील अभूतपूर्व वर्चस्व सिद्ध करते.