Breaking : इराणला ४.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का; त्याचा अणुचाचण्यांशी तर संबंध नाही?

युद्धाच्या काळात हा भूकंप झाल्यामुळे काही तज्ज्ञ संशय व्यक्त करत आहेत.
earthquake in Iran
इराणला ४.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का; त्याचा अणुचाचण्यांशी संबंध तर नाही? करतोयFile Photo
Published on
Updated on

earthquake in iran geras nuclear test may be reason iran us israel war

पुढारी ऑनलाईन :

इराणमध्ये 4.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अमेरिका–इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा भूकंप आल्याने, याचा संबंध अणुचाचणीशी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

earthquake in Iran
Chandra Grahan 2026 : आज संध्याकाळी दिसणार ब्लड मून, 'या' ४ राशींवर पडणार सर्वाधिक प्रभाव

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) यांच्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 4.3 इतकी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोल होते. हा भूकंप गराश या भागात जाणवला.

गराश हे फार्स प्रांत मध्ये स्थित शहर असून ते Gerash County चे मुख्यालय आहे. हे दक्षिण इराणमधील लारेस्तान (Larestan) प्रदेशाचा भाग आहे. इराण हा जगातील सर्वाधिक भूकंपीय सक्रिय देशांपैकी एक मानला जातो. येथे अरेबियन प्लेट आणि युरेशियन प्लेट यांच्या धडकेमुळे जाग्रोस फोल्ड थ्रस्ट बेल्ट तयार झाला आहे, आणि गराश हा याच भूकंपीय पट्ट्यात येतो.

earthquake in Iran
रंगपंचमीसाठी आलीय 'डायनासोर पिचकारी, इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, पाहा व्हिडिओ...

या भागात 4 ते 5 तीव्रतेचे भूकंप वारंवार होत असतात. 3 मार्च 2026 रोजी गराशमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला आहे.

मात्र, युद्धाच्या काळात हा भूकंप झाल्यामुळे काही तज्ज्ञ संशय व्यक्त करत आहेत. काहींच्या मते, इराण आपली अणुशक्ती दाखवण्यासाठी अणुचाचणी करू शकतो आणि त्यामुळेच हा भूकंप झाला असावा, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news