रंगपंचमीसाठी आलीय 'डायनासोर पिचकारी, इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, पाहा व्हिडिओ...

लोक एकच प्रश्न विचारत आहेत, ही पिचकारी मिळते कुठे?
dinosaur pichkari
रंगपंचमीसाठी आलीय 'डायनासोर पिचकारी, इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ, पाहा व्हिडिओ...file photo
Published on
Updated on

dinosaur pichkari video on instagram goes viral

पुढारी ऑनलाईन :

Viral Dinosaur Pichkari : होळीचा सण जवळ आला आहे. अशातच इंटरनेटवर डायनासोर डिझाइनची एक अनोखी पिचकारी जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही पिचकारी वापरताना एक तरूणी विचित्र आवाज काढताना दिसते. हे पाहून युजर्स व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला सतत एकच प्रश्न विचारत आहेत ही पिचकारी कुठे मिळेल?

dinosaur pichkari
Chandra Grahan 2026 : आज संध्याकाळी दिसणार ब्लड मून, 'या' ४ राशींवर पडणार सर्वाधिक प्रभाव

रंगपंचमीचा सण भारतात मोठ्या उत्‍साहात साजरा केला जातो. बुरा ना मानो होली है म्हणत सर्वांनाच रंगात रंगवून टाकलं जातं. असा हा अबालवृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा सण आपल्यासोबत आनंद घेउन येत असतो.

रंगपंचमीसाठी बाजारपेठही विविध रंग, गुलाल, फुगे, यांनी सजली आहे. मात्र यंदा बाजारात अशा-तशा नव्हे, तर इतक्या हटके पिचकार्‍या आल्या आहेत की मुलंच नाही, तर मोठेही त्या विकत घेण्याचा मोह आवरू शकत नाहीत. याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात डायनासोरच्या तोंडाच्या आकाराची पिचकारी दिसते. ती पाहून इंटरनेटवरील लोक विचारत आहेत ही मिळणार कुठे?

dinosaur pichkari
Chandra Grahan 2026 : आज संध्याकाळी दिसणार ब्लड मून, 'या' ४ राशींवर पडणार सर्वाधिक प्रभाव

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसतं?

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर क्रिएटर @bhakti_ramesh_98 यांनी शेअर केला आहे. क्लिपमध्ये एक कपल बाइकवर जाताना दिसतं. मागच्या सीटवर बसलेल्या महिलेच्या हातात ही पिचकारी आहे. पिचकारीच्या हँडलजवळच पाणी साठवण्याची जागा दिलेली आहे. जशीच महिला पिचकारीचा ट्रिगर दाबते, तसा त्यावरचा डायनासोर तोंड उघडतो आणि पाण्याची धार बाहेर फेकतो. यासोबतच पिचकारीतून ‘ए.. ए.. ए..’ असा विचित्र आवाजही येतो. हा आवाज ऐकून व्हिडिओच्या शेवटी ती महिला स्वतःही हसताना दिसते.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे—“मार्केटमध्ये नवीन आलं आहे.” लोकांना हे खेळणं इतकं आवडत आहे की शेअर केल्यानंतर अवघ्या 20 तासांतच या व्हिडिओला 43 लाख (4.3 मिलियन) पेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे.

या पिचकारीचं खरं नाव काय?

लोक जरी याला ‘डायनासोर वाली पिचकारी’ म्हणत असले, तरी ऑनलाइन मार्केटमध्ये अशा प्रकारचं प्रोडक्ट साधारणपणे ‘वॉटर स्क्वर्ट टॉय इंटरएक्टिव रिफिलेबल पोर्टेबल डायनासोर समर बीच टॉय’ या नावाने शोधलं आणि विकलं जातं. या अनोख्या खेळण्यावरून इंटरनेटवरील लोक मनसोक्त मजा घेत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये विविध प्रश्न विचारत आहेत.

एका युजरने गंमतीशीर कमेंट करत लिहिलं—“सुरुवातीला मला वाटलं हा आवाज तुम्हीच काढत आहात.”

दुसऱ्या युजरने आश्चर्य व्यक्त करत विचारलं—“यातून असा आवाजही येतो का?”

आणखी एका युजरने या आवाजाची तुलना ‘तारक मेहता’ मालिकेतील दयाबेनच्या हसण्याशी करत लिहिलं “यातून तर दयाबेनसारखी हसण्याची आवाज येते.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news