

पुढारी ऑनलाईन डेस्क : Earthquake in Caribbean | कॅरिबियन समुद्रात शनिवारी होंडुरासच्या उत्तरेला ७.५ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसने भूकंप १० किमी (६.२१ मैल) खोलीवर असल्याचे सांगितले. तसेच सुरुवातीला भूकंपाची तीव्रता ६.८९ असल्याचे म्हटले आहे.
यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये हैतीमध्ये ७.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतरचा हा या प्रदेशातील सर्वात मोठा भूकंप आहे. यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने सांगितले की कॅरिबियन समुद्र आणि होंडुरासच्या उत्तरेला भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. यूएस त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने भूकंपानंतर प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन बेटांसाठी देखील सूचना जारी केल्या आहेत.