
Dubai Maharashtra Cultural Society Digital Meet
दुबई : जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या आखाती देशांमध्ये राहणाऱ्या मराठी अनिवासी भारतीय संघटनांनीही तीव्र शब्दात निषेध दर्शवला. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित विशेष बैठकीत आखाती देशांमध्ये राहणाऱ्या मराठीजनांनी अनुभव सांगितला. आखाती देशांमध्ये राहणारे स्थानिक मुस्लिम नागरिकही पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करतायंत, असं संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
पहलगाममध्ये एप्रिल महिन्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून भारत- पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने चोहोबाजूंनी पाकिस्तानची कोंडी केली आहे. दुसरीकडे आखाती देशांमध्ये राहणाऱ्या मराठी अनिवासी भारतीय संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. दुबईतील महाराष्ट्र कल्चरल सोसायटीचे अध्यक्ष अभिजीत इगावे यांच्या पुढाकाराने ही डिजिटल बैठक पार पडली. या बैठकीत मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, युरोप, दक्षिण आफ्रिका आणि यूके येथील मराठी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
बैठकीत दुबई, बँकॉक आणि लंडन येथे महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक केंद्र उभारणीबाबतही चर्चा झाली.
अभिजीत इगावे
संयुक्त अरब आमिरातीमध्ये भारतीयांसह पाकिस्तानी नागरिकही मोठ्या प्रमाणात राहतात. गेल्या अनेक दशकांत भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धांनंतर किंवा अतिरेकी हल्ल्यांनंतरही कधीही इथले वातावरण तणावपूर्ण झाले नव्हते. मात्र पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर स्थानिक मुस्लिम नागरिकांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवल्याचे बैठकीत उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी सांगितले.
प्रत्येक देशातील महाराष्ट्र सदन उभारण्याचा अंदाजे खर्च हा २७५ ते ३०० कोटी रुपये एवढा आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदतीची गरज आहे.
विक्रम भोसले
दहशतवादी हल्ल्यांना कोणताही आधार नसतो. युएईतील दैनंदिन व्यवहारात स्थानिक नागरिकांकडून कधीच अडथळे निर्माण झाले नाहीत. मात्र या घटनेनंतर नातेसंबंधांमध्ये क्षुल्लक का होईना पण तणाव निर्माण झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीत कोण उपस्थित होते?
अभिजित देशमुख – छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) अध्यक्ष दुबई
नागेंद्र बेलुरे – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, सौदी अरेबिया (जुबैल)
राधिका साडेकर, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ, कुवेत
राघव साडेकर – गर्जे मराठी अध्यक्ष, कुवैत
अनुप वेल्हाळ – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, बहरैन
मेघना हसमनीस – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, बँकॉक, थायलंड
महेश धोमकर – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, दुबई
उषा पाटील – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, कतार
विक्रम भोसले, छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) उपाध्यक्ष, दुबई
सुनील मांजरेकर – अध्यक्ष GMBF दुबई
संतोष कारंडे, अध्यक्ष आमी परिवार, अमेरिका
मुकुंदराज पाटील – सत्यशोधक दुबई
संदीप कड – अध्यक्ष दुबई मराठी मंडळ
संदीप कर्णिक – माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, मस्कत, ओमान
राजेश पाटील – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विचारमंच, दुबई
सुनीता देशमुख – अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड दुबई
अभिजित सामंत – महाराष्ट्र मंडळ, सायप्रस
शिवाजी काका नारुने – अध्यक्ष, शिवाजी काका ग्रुप, दुबई
शांती पिसे – छत्रपती मराठा सामराज्य (CMS), यूके (लंडन)
स्नेहल कुलते – AAMI परिवार, यूएई
श्रीधर सावंत – महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष, अबुधाबी
सुरेश वाघमारे – माजी अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ, कुवैत