Arabian Sea Drug Seizure | अरबी समुद्रात कारवाई; ३,००० कोटींचे ड्रग्ज जप्त

५ पाकिस्तानींना अटक; दहशतवादविरोधी पथक, तटरक्षक दलाची मोहीम
कवरट्टी  : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद
विरोधी पथकाने लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात इराणच्या नौकेवरील संयुक्त कारवाईनंतर पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक केली.
कवरट्टी : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रात इराणच्या नौकेवरील संयुक्त कारवाईनंतर पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक केली. (पीटीआय फोटो)
Published on: 
Updated on: 

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी अरबी समुद्रात एका इराणी नौकेवर संयुक्त कारवाई करत ३,००० कोटींहून अधिक किमतीचे ५२६ किलो संशयित अमली पदार्थ जप्त केले. तर, पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्‍यात आली.

लक्षद्वीप परिसराच्या दिशेने अमली पदार्थांची ही मोठी खेप नेली जात असल्याची खात्रीशीर माहिती गुजरात ‘एटीएस’ आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात संशयास्पद नौकेचा माग काढण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली. सततची पाळत आणि वेगवान पाठलागानंतर तटरक्षक दलाच्या जवानांनी इराणी नौकेला घेरले आणि तिचा ताबा घेतला. झडतीदरम्यान नौकेतून हेरॉईन आणि मेथाम्फेटामाईनचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटवर हा मोठा आघात मानला जात आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या पाचही पाकिस्तानी नागरिकांना पुढील सखोल चौकशीसाठी मुंबईला आणण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याचा पर्दाफाश

या कारवाईची माहिती तटरक्षक दलाने अधिकृतपणे जाहीर करताना सांगितले की, या यशस्वी मोहिमेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीचा एक मोठा मार्ग उद्ध्वस्त झाला आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणे, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेट मोडून काढणे आणि देशाला संघटित गुन्हेगारीपासून सुरक्षित ठेवून ‘नशामुक्त भारत’ मोहिमेला बळ देणे यासाठी तटरक्षक दल कटिबद्ध आहे.

* अमली पदार्थांची जप्ती : अरबी समुद्रात इराणी जहाजातून ३,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ५२६ किलो हेरॉईन व मेथाम्फेटामाईन जप्त.

* पाकिस्तानी नागरिकांना अटक : जहाजावरील ५ पाकिस्तानी खलाशांना ताब्यात घेऊन नौका पुढील चौकशीसाठी मुंबई बंदरात आणली.

* गुप्तचर यंत्रणांची संयुक्त कारवाई : गुजरात ‘एटीएस’, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि तटरक्षक दलाने समन्वय साधत ही मोहीम फत्ते केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news