

Donald Trump Thank India: मध्य पूर्व आशियात अमेरिका, इराण आणि इस्त्रायल यांच्यात तुंबळ युद्ध सुरू आहे. याचा परिणाम फक्त मध्य पूर्व आशियातील देशांवर झालेला नसून संपूर्ण जगावर झाला आहे. कच्चं तेल आणि गॅसच्या निर्यातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या मोठ्या देशावर याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. सगळीकडं गॅस आणि पेट्रोलसाठी मारामार सुरु असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं खळबळ उडवून दिली आहे.
व्यावसायिक प्रवृत्तीचे असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आता उर्जा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करायला सुरूवात केला आहे असं सांगत आपण तब्बल ५० वर्षानंतर अमेरिकेत तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करत आहोत. यासाठी आमचे पार्टनर भारताचे आभार अशी पोस्ट केली आहे.
अमेरिका टेक्सासमधील ब्राऊनस्विलेमध्ये एक तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करणार आहे. यासाठी ऐतिहासिक अशी ३०० अब्ज डॉलरची डील झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी डील आहे.
डोनाल्ड ट्रम्प आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, हा अमेरिकेच्या कामगार आणि टेक्सासच्या लोकांचा मोठा विजय आहे. या गुंतवणुकीसाठी आम्ही आमचा सहयोगी देश भारत आणि त्यांची खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचे आभार मानतो. आमच्या अमेरिका फर्स्टच्या धोरणामुळं स्ट्रीमलाईन परमीट आणि टॅक्स कमी करण्यानं देशात अब्जावधी डॉलरची डील झाली आहे.
ट्रम्प यांनी ब्राऊन्सविलेच्या बंदरावर एक नवा तेल शुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यानं अमेरिकेच्या मार्केटला ताकद मिळेल. आपली राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल आणि उर्जा उत्पादनाला देखील चालना मिळेल. हा जगातील सर्वत स्वच्छ तेल शुद्धीकरण प्रकल्प असणार आहे.
इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमधून तेल वाहतूक बंद केली आहे. जगाचे जवळपास २० टक्के तेल याच मार्गातून जाते. होमुर्झ सामुद्रधुनीजवळ इराण ऑईल टँकरवर हल्ले देखील करत आहे. आंतरराष्ट्रीय मेरीटाईम ऑर्गनायजेशनच्या म्हणण्यानुसार होर्मुझ सामुद्रधुनीजवळ मर्चंड शीपवर झालेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत सात नाविकांचा मृत्यू झाला आहे.