Iran US-Israel War | इराणचे तेलसाठे ताब्यात घेऊ : ट्रम्प

खार्ग बेट ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्षांचा इशारा
Iran US War |
Iran US conflict : ट्रम्प यांचे युद्धविषयक अधिकार कायमfile photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन/तेहरान; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तेलसाठ्यावर नियंत्रण मिळवण्याची इच्छा व्यक्त करत खार्ग बेट ताब्यात घेण्याचा संकेत दिले. या वक्तव्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले की, इराणच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले खार्ग बेट ताब्यात घेण्याचा पर्याय अमेरिकेसमोर आहे. ‘आपण ते घेऊ शकतो किंवा नाही, आमच्याकडे अनेक पर्याय आहेत,’ असे ते म्हणाले. खार्ग बेट हे इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जाते.

अमेरिकेची लष्करी हालचाल वाढली

मध्यपूर्वेतील युद्ध पाचव्या आठवड्यात पोहोचले असताना अमेरिकेने अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे. यूएसएस त्रिपोली जहाजाद्वारे सुमारे 3,500 सैनिक पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 82वे एअरबोन दल पाठवण्याचीही तयारी सुरू आहे.

इराणचा कडक इशारा

इराणच्या संसदेचे अध्यक्ष महंमद बाघेर घालिबाफ यांनी अमेरिकेला कठोर इशारा देत म्हटले की, अशा कारवाईला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले जातील. अमेरिकन सैन्याने आक्रमण केल्यास त्यांना ‘जाळून टाकू’ असा इशाराही त्यांनी दिला.

शांतता प्रयत्न आणि वाढते तेलदर

दरम्यान, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तुर्कीचे नेते इस्लामाबादमध्ये बैठक घेत तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 116 डॉलरवर पोहोचली आहे.

2,076 जणांचा मृत्यू

इराणच्या आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत 2,076 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यात 216 मुलांचा समावेश आहे. युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news